पोलिसांनी टेम्पोतून आठ लाख ५८ हजारांचा गुटखा, तसेच टेम्पो असा १८ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सौरभ उर्फ धनराज निंबाळकर (थोरवे शाळेसमोर, कात्रज), संग्राम निंबाळकर ( २६) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ परिसरातील फालेनगर येथून गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली.पोलिस पथकाने सापळा लावून टेम्पो अडवला.
टेम्पोची तपासणी करण्यात आली, तेव्हा टेम्पोत गुटख्याचा साठा आढळला. अटक करण्यात आलेले दोघे जण भाऊ असून त्यापैकी एकाविरुद्ध यापूर्वी गु्न्हे दाखल झाले आहे.
अधिक तपास पोलीस करत आहेत.
BJP Live: स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच भाजप रणशिंग फुकणार12 जानेवारीला शिर्डीतून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच भाजप रणशिंग फुकणार...
भाजप सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे संदेश...