सोलापूर : मंडप साहित्य आणण्यासाठी जाताना रस्ता सोडायला सांगितल्याने रस्त्यावर भांडणाऱ्या दोघांनी पिकअप चालकाला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दगडाने पिकअपची समोरील काच फोडून नुकसान केले.
गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास शेळगीतील आदेश नगरात ही घटना घडली. याप्रकरणी त्या दोघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रदीप गोरख कांबळे (रा. बालाजी सोसायटी, सोलापूर), अब्दुल जावीद मणियार (रा. आदर्श नगर, शेळगी, सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. यातील फिर्यादी शेकुंबर गुंडुलाल तांबोळी (वय २७, रा. मित्रनगर, आरके हॉलसमोर, शेळगी, सोलापूर) यांना मारहाण झाली.