तुम्ही ‘सिक्रेट सांता’ हे शब्द नक्कीच ऐकले असतील. गेल्या काही वर्षांत हा ट्रेंड कामाच्या ठिकाणी अधिक प्रमाणात दिसून येत आहे. ज्यामध्ये तुम्हाला ऑफिसमधील कोणत्याही ओळखीच्या किंवा अनोळखी सहकाऱ्याला स्वत:चे नाव कळू न देता एक गिफ्ट द्यायचे असते. एखाद्या व्यक्तीसाठी भेटवस्तू निवडणे हे एक कठीण काम असू शकते. विशेषत: तेव्हा
जेव्हा आपण त्या व्यक्तीला ओळखत नसतो. अशा परिस्थितीत, काहीतरी उपयुक्त भेटवस्तू देणे गरजेचे असते. जर तुम्हीही एखाद्याचे सिक्रेट सांता असाल तर आजच्या या लेखात दिलेल्या भेटवस्तूंवर एक नजर टाका, यामुळे तुम्हाला भेटवस्तू निवडण्यात मदत होऊ शकते.
– जाहिरात –
हा एक असा पर्याय आहे जो तुम्ही तुमच्या कोणत्याही पुरुष किंवा महिला सहकाऱ्यांना भेट देऊ शकता. ही एक अतिशय उपयुक्त भेट आहे आणि ती तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या बजेटमध्ये मिळू शकते, त्यामुळे बजेटचा विचार करून कोणती भेट सर्वोत्तम असेल ते ठरवा.
– जाहिरात –
घराच्या सजावटीच्या वस्तू देखील आहेत ज्या तुम्ही सहज कोणालाही देऊ शकता. अनेक सहकारी त्यांचे डेस्क चांगले सजवून ठेवतात, त्यामुळे त्यांना तुमच्याकडून मिळालेली ही भेट नक्की आवडेल. यामध्ये तुम्ही शोपीस, वॉल पेंटिंग इत्यादी कोणत्याही सजावटीच्या वस्तू देऊ शकता.
जर तुम्हाला वाटत असेल की ज्या व्यक्तीचा सिक्रेट सांता तुम्ही आहात तो फिटनेस फ्रीक आहे किंवा त्याला त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे , तर तुम्ही त्याला काही फिटनेस गॅजेट्स भेट देऊ शकता. यामध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण फिटनेस गॅजेट्स हा पर्याय थोडा खर्चीक ठरू शकतो. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या.
जर तुम्ही महिला सहकाऱ्याचा सिक्रेट सांता असाल तर तुम्ही तिच्यासाठी काही छान ॲक्सेसरीज खरेदी करू शकता. मुलींसाठी कमी बजेटमध्ये तुम्हाला अनेक पर्याय मिळू शकतात.
बॅग, मेकअप किट, बेल्ट, परफ्यूम आणि बरेच काही. त्यांच्या वॉर्डरोबमध्ये कितीही कलेक्शन असले तरी ते कमीच वाटतात. या प्रसंगी तुम्ही तुमच्या पुरुष सहकाऱ्याला डिओड्रंट,
वॉलेट, बेल्ट भेट म्हणून देता येईल.
ख्रिसमसच्या निमित्ताने तुम्ही स्वतः केक बनवू शकता किंवा केक विकत घेऊन तुमच्या नातेवाईकांना, जवळच्या व्यक्तींना, प्रियजनांना, मित्रांना सिक्रेट सांता म्हणून भेट देऊ शकता. चॉकलेट, ड्रायफ्रूट्स देखील भेट म्हणून देता येतील. परंतु गोड पदार्थ देत असताना समोरच्या व्यक्तीला काही आरोग्यविषयक समस्या तर नाही ना याचीही खात्री करून घ्या.
ख्रिसमसला भेटवस्तू देण्यासाठी वनस्पती हादेखील एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, जवळच्या व्यक्तींना, प्रियजनांना सीक्रेट सांता म्हणून फुलझाडं किंवा फळांची लहान रोपंही भेट म्हणून देऊ शकता.ऑनलाइन जमान्यात रोपेही ऑनलाइन मागवून पाठवता येतात.
पुस्तक अशी गोष्ट आहे जी तुम्ही कोणालाही कधीही भेट देऊ शकता. यासाठी तुम्ही ज्याचे सिक्रेट सांता आहात त्याला कोणत्या विषयावरची पुस्तके वाचायला आवडतात. हे ठाऊक असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला याविषयी काही माहिती नसेल तर तुम्ही एक हलकंफुलकं आणि गंमतीशीर पुस्तक भेट देऊ शकता.
हेही वाचा : Christmas Gift Ideas : ख्रिसमसच्या निमित्ताने बच्चे कंपनीला हे गिफ्ट द्या
संपादन- तन्वी गुंडये