भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना होत आहे. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने कमबॅक केलं आहे. टी20 मालिकेत हरमनप्रीत कौर खेळली नव्हती. पण वनडे मालिकेत पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा हाती घेतली आहे. पहिल्याच सामन्यात नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजच्या बाजूने लागला. वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजने क्षणाचाही विलंब न करता गोलंदाजी स्वीकारली. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची टी20 मालिका 2-1 ने जिंकली होती. आता हीच कामगिरी वनडे मालिकेतही कायम ठेवायची आहे. 2025 मध्ये भारतात वनडे वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे आतापासूनच भारताला संघाला बूस्टर देण्याचं काम करावं लागणार आहे. त्यामुळे यापुढे होणाऱ्या प्रत्येक वनडे मालिका भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे. भारताने अद्याप एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. दोन्ही संघात भारतात 21 सामने झाले आहेत त्यापैकी 15 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.
वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूज म्हणाली की, ‘आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करू. नव्या मैदानावर संधी असते. पहिल्यांदा गोलंदाजी केली तयारीची चांगली संधी मिळते. आम्ही चांगला सराव केला आहे.’ दरम्यान, ही काळ्या-मातीची खेळपट्टी असून थोडेसे गवत आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर चांगल्या धावा होतील. पण असं असलं तरी कसा खेळ होतो याकडे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दुसरीकडे, कर्णधार हरमनप्रीत कौरने पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल असं सांगितलं आहे.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना, प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सायमा ठाकोर, तितास साधू, प्रिया मिश्रा, रेणुका ठाकूर सिंग
वेस्ट इंडिज महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शेमेन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, रशादा विल्यम्स, झैदा जेम्स, शबिका गजनबी, आलिया ॲलेने, शमिलिया कोनेल, एफी फ्लेचर, करिश्मा रामहरक