Katrina kaif : 'जेव्हा माझा नवरा म्हणतो...' कतरिना कैफने सांगितले विकी कौशल आणि त्यांच्या नात्यातील गुपित !
Saam TV December 22, 2024 08:45 PM

Katrina kaif : बॉलिवूड स्टार कतरिना कैफ आणि विकी कौशल हे एक पॉवर कपल आहेत. जेव्हा जेव्हा हे कपल सोशल मीडियावर फोटो शेअर करते तेव्हा चाहते अनेक कमेंट करतात. लग्नाच्या तीन वर्षांनंतरही दोघांमध्ये कमालीची रोमँटिक केमेस्ट्री दिसून येते. याचा गोष्टीचा खुलासा खुद्द कतरिना कैफने केला आहे. कतरिनाने सांगितले विकीसोबत तिचे नाते कसे आहे.

कतरिना कैफने विकी कौशलचे कौतुक केले

एका मुलाखतीत ने विकी कौशलबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. कतरिनाने सांगितले की, काम आणि क्वालिटी टाइम याबाबत दोघांमध्ये कसा समन्वय आहे. कतरिना म्हणाली, ' एकत्र असताना आजही मला माझा नवरा मोबाईल ठेव म्ह्णून सांगतो पण मला माझ्या कामाचा आणखी एक मेल पाठवायचा असतो. असे म्हणत कतरिना हसली.

कतरिना पुढे म्हणते, 'चित्रपटांव्यतिरिक्त माझ्याकडे आणखी काही कामे आहेत ती पूर्ण करणे आवश्यक आहे. माझी ही सगळी काम लिहून ठेवलेली असतात आणि मी माझी काम ठरलेल्या दिवशीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. पण जेव्हा मला घरी वेळ द्यायचा असतो, तेव्हा मी कोणतेही काम घरी आणत नाही आणि विकीही तेच करतो.

विकी-कतरिना बाथरूम शेअर करत आहे

कतरिनाला विचारण्यात आले की, बाथरुम शेअर करण्यावरून तिचे विकीसोबत काही भांडण झाले आहे का? यावर कतरिना हसते आणि म्हणते, 'अजिबात नाही, खूप समजूतदार नवरा आहे आणि त्याला कसे जुळवून घ्यायचे हे माहित आहे. यावर कतरिना म्हणते, आम्ही कितीही बिझी असलो तरी आमच्या ऍनिव्हर्सरीसाठी कुठेतरी दूर जातो जिथे फक्त आपण असतो, आम्हाला अशी ठिकाणं आवडतात.'

विकी आणि कतरिना कैफचे लग्न कसे झाले?

विकी कौशल आणि कतरिना कैफ खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. कतरिनाने नेहमी विकीच्या अभिनयाचे कौतुक केले, तर विकी अनेकदा अवॉर्ड फंक्शनमध्येही कतरिनासोबत फ्लर्ट करताना दिसला. लॉकडाऊन दरम्यान त्यांच्या अफेअरचे किस्से जास्त ऐकायला मिळाले आणि ९ डिसेंबर २०२१ रोजी दोघांनी लग्न केले. त्यांचे लग्न अतिशय खाजगी ठेवण्यात आले होते ज्यात फक्त खास लोकांना आमंत्रित करण्यात आले होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.