वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतून पाच संघ आऊट झाले आहेत. श्रीलंकेला अंतिम फेरी गाठण्यासाठी काठावरची शक्यता आहे. तर भारताला अंतिम फेरीसाठी दोन्ही सामने जिंकणं भाग आहे असं काहीसं समीकरण गेल्या दिवसात मांडलं जात आहे. ते खरंही आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तर अंतिम फेरी गाठेल यात शंका नाही. पण दोन पैकी एका सामन्यात पराभव झाला तर भारताला अंतिम फेरीची संधी मिळू शकते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर त्याचं हो असं आहे. भारताचे उर्वरित सामने मेलबर्न आणि सिडनी येथे होणार आहेत. भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊयाच अंतिम फेरीच्या चार समीकरणांबाबत..
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन सामना बाकी आहेत. त्यापैकी भारताने एका सामन्यात विजय मिळवला आणि एक ड्रॉ झाला तर भारताचे 55.26 विजयी टक्केवारी होईल. दुसरीकडे, श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला 1-0 ने पराभूत केलं तर भारत गुणातलिकेत दुसऱ्या स्थानी राहील आणि अंतिम फेरीत स्थान मिळवेल.
मालिकेतील उर्वरित दोन सामन्यात एक सामना भारताने आणि एक सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर 2-2 अशी बरोबरी राहील. तेव्हाही भारताची विजयी टक्केवारी ही 55.26 राहील. अशा स्थितीत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला 1-0 ने पराभूत केलं तर भारत अंतिम फेरीत स्थान मिळवेल.
मालिकेतील पुढचे दोन्ही सामने ड्रॉ झाले आणि मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली तर भारताची विजयी टक्केवारी 53.51 राहील. अशा स्थितीतही श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला 1-0 ने पराभूत केलं तर भारत अंतिम फेरीत स्थान मिळवेल.
भारत ऑस्ट्रेलिया मालिका 1-1 बरोबरीत सुटली तर पाकिस्तानकडून मदत होऊ शकते. पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेला 2-0 ने पराभूत केलं तर भारत 53.51 विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर पोहोचेल. तर दुसऱ्या अंतिम फेरीतील संघ श्रीलंका किंवा ऑस्ट्रेलिया असू शकते. म्हणजेच पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेला 2-0 ने पराभूत केलं भारताच्या आशा वाढतील.