पीव्ही सिंधू आज तिचा होणारा नवरा वेंकट दत्तासोबत उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवैतमध्ये रत्नागिरीतल्या कामगाराशी मराठीतून संवाद साधला.
Union Minister Ram Mohan Naidu Kinjarapu LiveUpdate: राम मोहन नायडू किंजरापू यांनी देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन एटीसी टॉवर कम तांत्रिक ब्लॉकचे उद्घाटन केलेराम मोहन नायडू किंजरापू यांनी देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन एटीसी टॉवर कम तांत्रिक ब्लॉकचे उद्घाटन केले
Narendra Modi Live Update: नरेंद्र मोदींनी कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्यासोबत कुवेतमध्ये बैठक घेतली Amit Shah: अमित शहा यांनी केले विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटत्रिपुरा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धलाई जिल्ह्यातील कुलई आरएफ व्हिलेज ग्राउंड येथे 668.39 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
shiv sena live: राहुल गांधींच्या परभणी भेटीवर शिवसेनेची टीकापरभणीला काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भेटीवर शिवसेना नेत्या शायना एन.सी. यांनी टीका केली आहे. त्या म्हणाल्या, "राहुल गांधी खासगी विमानाने परभणीत येत आहेत. ते नांदेडला येणार, परभणीत जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबासोबत असल्याचा दिखावा करतील. माझा प्रश्न आहे, जेव्हा संसदेबाहेर असा वाद होतो, तेव्हा राहुल गांधी बाहेरही येत नाहीत आणि आता खासगी चार्टर घेऊन येथे येत आहेत? लोक या ढोंगीपणाला समजू शकतात. आम्ही परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी व त्यांच्या कुटुंबासोबत पूर्णपणे आहोत, परंतु या प्रकरणावर कधीही राजकारण करणार नाही."
Mumbai Live : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची कौंटुबिक लग्नसोहळ्यात भेट, एकमेकांशी साधला संवादराज ठाकरे यांच्या भावाच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे यांनीही हजेरी लावली. यावेळी दोघांनी कौंटुंबिक संवाद झाला.
Pune Live : शरद पवारांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, भीमथडी जत्रेस येण्याचे दिले निमंत्रणशरद पवार यांनी रविवारी सकाळी पुण्यातील भीमथडी जत्रेस भेट दिली. दरम्यान शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन जत्रेला येण्याचे निमंत्रण दिले आहे.
Maharashtra Live : इम्तियाज जलील यांच्यासह MIM च्या 30 आंदोलकांवर गुन्हे दाखलद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि गाढवाचा वापर केल्याप्रकरणी इम्तियाज जलील यांच्यासह MIM च्या 30 आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
Mumbai Live : ओबीसी नेत्यांची मुंबईत दुपारी बैठकछगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ओबीसी नेत्यांनी बैठक बोलावली आहे. मुंबईतील नरिमन पाॅईंट येथे ही बैठक आज दुपारी होणार आहे.
Maharashtra Live : मुंबई-गोवा महामार्गावर बसला भीषण आगमुंबई गोवा महामार्गावर कोलाड इथे खाजगी प्रवासी बस जळून खाक झाली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. 34 प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे. मात्र बससह प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले.
Pune: पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूचपुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच
वारजे परिसरात गाड्यांची तोडफोड
वारजे माळवाडी,गोकुळनगर पठार भागात अनेक चारचाकी गाड्यांच्या काचा फोडण्याचा प्रकार
आठ ते दहा गाड्यांची केली तोडफोड
वारजे पोलिसाचा तपास सुरू
गेले काही दिवसात पुण्यात गाड्या तोडफोडेचे सत्र सुरूच आहे पोलिसांचा वचक आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे
Pune: पुण्यातील दाट धुक्यामुळे २२ विमान उशिरानेपुण्यातील दाट धुक्यामुळे २२ विमानांना उशिराने उड्डाण घ्यावे लागले आहेत
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शनिवारी पडलेल्या दाट धुक्याचा सकाळी सहा ते दुपारी १२ दरम्यान २२ विमानांना याचा फटका बसला आहे
एवढंच नाही तर पुण्यात येणारे एक विमान दुसऱ्या शहराकडे वळवावे लागले. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले
Pune Live: पुण्यातील भोर तालुक्यात रब्बी हंगामातील ई-पिक पाहणीला सुरुवातपुण्यातील भोर तालुक्यात रब्बी हंगामातील ई-पिक पाहणीला सुरुवात
ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकारी यांच्याकडून प्रत्यक्ष शेतावरून जाऊन ई पिक पाहणी कशी करायची याविषयी शेतकऱ्यांना करण्यात येतंय मार्गदर्शन..
नेमून दिलेल्या साहाय्यकांच्या सहकार्याने, सर्व शेतकऱ्यांनी 15 जानेवारी पर्यंत पिक पाहणी पूर्ण करावी, प्रशासनाचं शेतकऱ्यांना आवाहन..
Pune: गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडलापोलिसांनी टेम्पोतून आठ लाख ५८ हजारांचा गुटखा, तसेच टेम्पो असा १८ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सौरभ उर्फ धनराज निंबाळकर (थोरवे शाळेसमोर, कात्रज), संग्राम निंबाळकर ( २६) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ परिसरातील फालेनगर येथून गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली.पोलिस पथकाने सापळा लावून टेम्पो अडवला.
टेम्पोची तपासणी करण्यात आली, तेव्हा टेम्पोत गुटख्याचा साठा आढळला. अटक करण्यात आलेले दोघे जण भाऊ असून त्यापैकी एकाविरुद्ध यापूर्वी गु्न्हे दाखल झाले आहे.
अधिक तपास पोलीस करत आहेत.
BJP Live: स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच भाजप रणशिंग फुकणार12 जानेवारीला शिर्डीतून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच भाजप रणशिंग फुकणार...
भाजप सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे संदेश...