Maharashtra Live Update: उपमुख्यमंत्री झाल्यावर शिंदेंचा पहिल्यांदा ३ दिवसांचा दरे गावात दौरा
Saam TV December 23, 2024 12:45 AM
Eknath Shinde News : उपमुख्यमंत्री झाल्यावर शिंदेंचा पहिल्यांदा ३ दिवसांचा दरे गावात दौरा

उपमुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे पहिल्यांदा ३ दिवसांच्या सातारा दौऱ्यावर असणार आहेत. ते तीन दिवस दरे गावात राहणार आहे.

ST Bus Accident : नगर मनमाड महामार्गावर ST बस आणि कंटेनरचा भीषण अपघात

नगर मनमाड महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात एसटी बसचे मोठे नुकसान झालंय. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शिवारातील घटना आहे. शिर्डीहून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या बसचा अपघात झाला. जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरू...

Murud : मुरूडच्या नांदगावात रानगव्याचा वावर

मुरुड तालुक्यातील नांदगाव परीसरात रानगवा आढळून आला आहे. या रानगव्याने एका ग्रामस्थांवर हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरल आहे. मोकाट रानगवा नारळीच्या बागेत, समुद्र किनारी मोकाट धावताना पहायला मिळत आहे. हा रानगवा फणसाड अभयारण्यातुन मानवी वस्तीत झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

Devendra Fadnavis : कॅगचा अहवालावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना कोरोना काळात औषध खरेदीसाठी असलेला निधी खर्चित केला नसल्याचा कॅगचा अहवाल आहे. ७१ टक्के औषध खरेदी झाले नाही, असा कॅगचा अवहाल आला असून यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी प्रतिक्रिया दिली. 'मला असे वाटते की निश्चित गंभीर बाब आहे. मात्र अहवालाच्या खोलवर मी गेलेलो नाही. त्यावर अभ्यास करून मी नंतर बोलेल , असे मुख्यमंत्री म्हणाले.

भाजी पाल्याचे दर घसरले.काकडीला मिळतोय कवडीमोल भाव

बाजारात भाजी पाल्यांचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.त्यामुळे भाजी पाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. काकडीला देखील बाजारात कवडीमोल भाव मिळतोय.काकडीला बाजारात 10 ते 12 रुपय प्रति किलो दर मिळत असल्याने काकडी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील सखाराम नांदेडकर या शेतकऱ्याने आपल्या एक एकर शेती मध्ये काकडीची लागवड केली.यासाठी त्यांना 60 हजार रुपये खर्च आला.परंतु बाजारात काकडीला भाव नसल्याने लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Maharashtra Live Update: तीन मार्च २०२५ रोजी राज्याचा अर्थसंकल्प, अजित पवार यांची माहिती

आपण परवा जाऊन खात्याचा कारभार स्विकारणार असून 3 मार्चला अर्थसंकल्प आहे.शिंदे आणि फडणवीस यांना विश्वासामध्ये घेऊन तो तयार करायचा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलयं. बारामतीत अजित पवारांच्या हस्ते अष्टविनायक ज्वेलर्स उद्घाटन पार पडले. त्यावेळी अजित पवार बोलत होते.

Maharashtra Live Update: शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन

शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन

भीमथडी जत्रा आणि साहित्य संमेलन देण्यासाठी केली विनंती

साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे

आज सकाळी मोदी बागेमध्ये साहित्य संमेलन आयोजकांनी घेतली होती पवारांची भेट

त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्री यांच्याशी फोनवरून साधला संवाद

शरद पवार भीमथडी जत्रेत फिरत असताना साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

Maharashtra Live Update: कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचे हेलीकॉप्टरने राजापुर येथे आगमन

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचे हेलीकॉप्टर ने राजापुर येथे आगमन.

भाजप कार्यकर्त्यांनी नितेश राणे यांचे घोषणाबाजीत केले जल्लोषात स्वागत

नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दिशेने रवाना

जिल्ह्याची सीमा असलेल्या खारेपाटण येथे नितेश राणेंचे होणार मोठ्या धुमधडाक्यात स्वागत

जेसीबीच्या सहाय्याने होणार पुष्पवृष्ठी

अजित पवार यांच्या विरोधात ओबीसी संघटना आणि ग्रामस्थ आक्रमक;रस्त्यावर येऊन केली जोरदार घोषणाबाजी

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्यामुळे राज्यभरात ओबीसी संघटना आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.त्याच पार्श्वभूमीवर आज जालनाच्या बदनापूर मधील डावरगाव येथे सकल ओबीसी समाज आणि ग्रामस्थांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शन केली.

खातेवाटप झाल्यानंतर लगेचच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावी मुक्कामी येतात. हा त्यांचा खाजगी दौरा असून देवदर्शनासाठी ते गावी येत असल्याची माहिती मिळते आहे. दुपार नंतर ते दरेगावी पोहोचतील त्यानंतर त्यांचा गावी मुक्काम असेल. Maharashtra Live Update: अडीच वर्षांनंतर मंत्रिपदासाठी अजित पवार नांदेडचा विचार करतील- प्रताप पाटील चिखलीकर

मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप देखील झाले आहे.परंतु नांदेड जिल्ह्याला एकही मंत्री पद मिळाले नाही.यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Maharashtra Live Update: दाट धुक्यामुळे विमानसेवेवर परिणाम

पुण्यातील दाट धुक्यामुळे २२ विमानांना उशिराने उड्डाण घ्यावे लागले आहेत

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शनिवारी पडलेल्या दाट धुक्याचा सकाळी सहा ते दुपारी १२ दरम्यान २२ विमानांना याचा फटका बसला आहे

एवढंच नाही तर पुण्यात येणारे एक विमान दुसऱ्या शहराकडे वळवावे लागले. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले

धुक्यामुळे अर्ध्या तासापासून ते तीन तासांपर्यंत विमानांच्या उड्डाणाला उशीर झाल्याचे दिसून आले.

दिल्लीनंतर बेंगळुरू, अहमदाबाद, रांची, हैदराबाद, किशनगड, चेन्नई, बँकॉक या शहरांसाठी जाणाऱ्या विमानांना उशीर झाला.

Maharashtra Live Update: विठ्ठलपूजेचे ऑनलाईन बुकिंग 1 जानेवारीपासून

सावळ्या विठुरायाची पूजा करण्यासाठीची हजारो भाविकांची प्रतीक्षा आता संपली आहे. नवीन वर्षातील पहिल्या तीन महिन्यासाठी येत्या 1 जानेवारी रोजी विठ्ठल रुक्मिणीच्या तुळशीपूजा, नित्यपूजा आणि पाद्यपूजेसाठी आॅनलाईन बुकिंग सुरु केले जाणार आहे. भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेत स्थळावरच आॅनलाईन बुकिंग करावे असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे. भाविकांना आता घर बसल्या पूजेची नोंदणी करता येणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.