Cars And Bike Gift: मालक असावा तर असा... कर्मचाऱ्यांना गिफ्ट केल्या आलिशान कार आणि महागड्या बाईक
Times Now Marathi December 23, 2024 03:45 AM

Cars And Bike Gift: दिवाळीनिमित्त कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना महागड्या भेटवस्तू दिल्याच्या बातम्या अनेकदा येत असतात. यामध्ये मर्सिडीज, दागिने, रोख इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश असतो. या गिफ्टद्वारे कंपन्या आणि कर्मचारी देखील प्रसिद्धीच्या झोतात येतात. गुजरातचे हिरे व्यापारी सावजी ढोलकिया हे या प्रकरणाने खूप प्रसिद्ध आहेत. पण यावेळी ख्रिसमसच्या निमित्ताने चेन्नईतील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना महागड्या कार आणि बाईक्स गिफ्ट म्हणून दिल्या आहेत. सरमाउन्ट लॉजिस्टिक्स सॉल्यूशन्स प्राइव्हेट लिमिटेड (Surmount Logistics Solutions Private Limited ) असे या कंपनीचे नाव आहे.

या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कठोर परिश्रम आणि कंपनीप्रती समर्पणाच्या भावनेसाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून आलिशान कार आणि महागड्या बाईक्स गिफ्ट केल्या आहेत. कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. कंपनीच्या 20 कर्मचाऱ्यांना टाटा कार, ॲक्टिव्हा स्कूटी आणि रॉयल एनफिल्ड बाईक गिफ्ट म्हणून देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना 'उच्च लक्ष' गाठण्याची प्रेरणा मिळावी यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला.


कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे कंपनी
चेन्नईचे मुख्यालय असलेले सरमाउन्ट लॉजिस्टिक्स सॉल्यूशन्स प्राइव्हेट लिमिटेड (Surmount Logistics Solutions Private Limited ) ही कंपनी मालवाहतूकीला झालेला विलंब, पारदर्शकतेचा अभाव आणि अकार्यक्षम पुरवठा शृंखला अशी लॉजिस्टिक क्षेत्रातील सामान्य आव्हाने हाताळते. कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) डेन्झिल रायन यांनी कर्मचाऱ्यांना कार आणि बाइक्स गिफ्ट केल्यानंतर दिलेल्या निवेदनात म्हटले की, “आमचे ध्येय सर्व आकारांच्या व्यवसायांसाठी लॉजिस्टिक सुलभ करणे हे आहे.


गिफ्ट देण्याबाबात काय म्हणाले मालक ?
कपनीचे मालक डेन्झिल रायन म्हणाले की, "पारंपारिक मालवाहतूक आणि लॉजिस्टिक प्रक्रियेतील अडचणी आम्हाला समजतात. आमचे उद्दिष्ट केवळ कार्यक्षमच नाही तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही जागरूक असणारे उपाय प्रदान करणे आहे." कर्माचाऱ्यांना गिफ्ट देण्याबाबत ते म्हणाले की "मजबूत कर्मचारी कल्याण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमुळे कर्मचाऱ्यांचे एकूण समाधान सुधारते आणि त्यांची उत्पादकता आणि व्यस्तता देखील वाढते. कारण प्रेरित कर्मचारी सर्वोत्तम कामगिरी करण्याची अधिक शक्यता असते."

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.