Lipstick Hacks: आजकाल लिपस्टिक प्रत्येक महिलांचा जीवनशैलीचा भाग बनला आहे. खरं तर, लिपस्टिकशिवाय छान लुक मिळणे खूप अवघड काम आहे. त्यामुळे आकर्षण दिसण्यासाठी खास प्रसंगी लिपस्टिक लावायला महिला कधीच चुकत नाहीत. पण या लिपस्टिक काही तासांनी पुसट होत असल्याकारणामुळे अनेक महिला वारंवार लिपस्टिक ओठांना लावत बसतात. जे त्यांच्या आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरते. त्यामुळे एकदा लावलेली लिपस्टिक दिवसभर कायम राहण्यासाठी कोणता फॅशन हॅक्स आहे का? असा सवाल अनेकजणी करतात.
तुम्ही देखील जर लिपस्टिक प्रेमी असाल, आणि तुम्हाला देखील दर तासांनी लिपस्टिक लावायची सवय असेल, तर या काही हॅक्सनी तुम्ही तुमची ही सवय दूर करू शकता. कारण एकदा लावलेली लिपस्टिक तब्बल 12 तास जशीच्या तशी तुमच्या ओठांवर कायम राहण्यास यामुळे मदत होणार आहे.