Pune Accident: रात्रीच्या वेळी मद्यधुंद डंपर चालकाने नऊ जणांना चिरडले, तीघांचा जागीच मृत्यू
esakal December 23, 2024 06:45 PM

Wagholi Dumper Accident: भरघाव डंपरने फूट पाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले असल्याचे वृत्तसेमोर येत आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमी मधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे असल्याचे म्हटले जात आहे. ही घटना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्यावर घडली. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता.

वैभवी रितेश पवार ( वय १ वर्ष ), वैभव रितेश पवार वय २ वर्ष, रीनेश नितेश पवार, वय ३० वर्ष अशी मृतांची नावे आहेत. तर सहा जण जखमी आहेत. जखमींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हे सर्व कामगार आहेत.

रविवारी रात्रीच ते अमरावती येथून कामासाठी आले होते. या फूटपाथ वर १२ जण झोपले होते. तर बाकी फूटपाथ च्या बाजूला झोपड्यात झोपले होते. मजुरी करणारे हे सर्व कामगार आहेत. भरघाव डंपर सरळ फूटपाथवर चढून झोपलेल्यांच्या अंगावर गेला.

(Pune Accident Three Dead, Nine Injured as Dumper Truck Crushes People on Footpath)

मृतांची नावे

वैभवी रितेश पवार ( वय १ वर्ष ),

वैभव रितेश पवार वय २ वर्ष,

रीनेश नितेश पवार, वय ३० वर्ष

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.