National Farmers Day : राष्ट्रीय किसान दिवस २३ डिसेंबरलाच का साजरा करतात; काय आहे त्याच्या मागचा इतिहास?
Mensxp December 23, 2024 09:45 PM

National Farmers Day Celebration  : 

भारतात प्रत्येक वर्षी २३ डिसेंबरला नॅशनल फॉर्मर्स डे साजरा केला जातो. या दिवसाला किसान दिवस देखील म्हणतात. हा दिवस देशाच्या विकासात मोलाचे योगदान देणाघ्या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या दिवशी भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना देखील त्यांच्या देशासाठी दिलेल्या योगदानासाठी आदरांजली वाहिली जाते. 

चौधरी चरण सिंह हे शेतकऱ्यांच्या हक्कांचे मोठे पुरस्कर्ते होते. आजच्या दिवशी म्हणजे २३ डिसेंबरला त्यांची जयंती असते. हा दिवस देशातील शेतकऱ्यांसाठी समर्पित केला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, चौधरी चरण सिंह हे गरीब आणि शेतकऱ्यांचे खरे शुभचिंतक होते. ट्विटरवरील पोस्टमध्ये पंतप्रधानांनी चौधरी चरण सिंह यांनी देशाची केलेली सेवा सर्वांना कायम प्रेरणा देईल असं देखील म्हटलं आहे. 

हेही वाचा : अखेर पुष्पा २ मध्ये कृणाल पांड्यासारखा दिसणारा हा 'खलनायक' कोण?

का केला जातो किसान दिवस साजरा?

istock

देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांनी दिलेल्या महत्वाच्या योगदानाची आठवण ठेवण्यासाठी राष्ट्रीय किसान दिवस साजरा केला जातो. भारताची अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान अर्थव्यवस्था आहे. देशाच्या अन्न सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्यामध्ये शेतकऱ्यांचा मोला वाटा असतो. 

या दिवशी सध्याच्या घडीला देशातील कृषी क्षेत्राला, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधता येते. यामध्ये किमान आधारभूत किंमत, वातावरण बदल, शेतीतील नवीन तत्रज्ञांनाचा अवलंब या विषयांचा समावेश आहे. राष्ट्रीय किसान दिवसाच्या निमित्ताने शेतकऱ्यांसाठीच्या कल्याणासाठी सरकारी धोरणे आणि सुधारणा यांच्यात कसा सकारात्मक बदल करता येईल याबाबत चर्चा करण्याची संधी मिळते. 

हेही वाचा : हेल्थ टिप्स: हिवाळ्यात धोकादायक आजार दूर राहतील, अशी घ्या आहाराची विशेष काळजी

चौधरी चरण सिंह 

Twitter

किसान दिवस हा चौधरी चरण सिंह यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंतीच्या दिवशी साजरा केला जातो. त्यांनी १९७९ ते १९८० पर्यंत भारताचे पंतप्रधानपद भूषवलं होतं. त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाची धोरणे अंमलात आणली होती. त्यांनी भूमी सुधारणा, शेती उत्पादन क्षमता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे हक्क यांच्या सदर्भातील धोरणांची पायाभरणी केली. 

चौधरी चरण सिंह यांचे प्रसिद्ध कोट्स
  • 'खरा भारत हा ग्रामीण भागात राहतो.'
  • 'धैर्य धरा! वेळ आली की गवताचे रूपांतर देखील दुधात होते.'
  • 'आपल्या शत्रूच्या दु:खात देखील आपल्या डोळ्यात अश्रू असले पाहिजेत.'
  • 'देशाच्या ग्रामीण भागाची उन्नतीआणि त्यांची क्रयशक्ती वाढली तरच देश समृद्ध होतो.' 
  • 'शेतकरी या देशाचा खरा मालक आहे. मात्र ते त्यांची ताकद विसरले आहेत.' 


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.