भारत-बांगलादेश बातम्या: भारतातील एक राज्य असे आहे की या राज्याचे बांगलादेशकडे 200 कोटी रुपये बाकी आहेत. बांगलादेशकडे त्रिपुरा राज्याचे 200 कोटी रुपयांचे वीज बिल बाकी आहे. सोमवारी ही माहिती राज्याचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी दिली आहे. शेजारील देशाचा वीजपुरवठा बंद करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्रिपुरा स्टेट इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेड NTPC इलेक्ट्रिसिटी ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत शेजारच्या देशाला 60 ते 70 मेगावॅट वीज पुरवठा करते. यासाठी बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डासोबत करार करण्यात आला आहे.
त्रिपुराने मार्च 2016 मध्ये बांगलादेशला वीजपुरवठा सुरु केला होता. दक्षिण त्रिपुरातील पलाताना येथे 726 मेगावॅट क्षमतेच्या सरकारी मालकीच्या ONGC त्रिपुरा पॉवर कंपनीच्या (OTPC) गॅस-आधारित पॉवर प्लांटमध्ये वीज निर्मिती केली जाते.
मुख्यमंत्री माणिक साहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशने आमचे वीज पुरवठ्याचे सुमारे 200 कोटी रुपये दिलेले नाहीत. थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. आम्हाला आशा आहे की ते थकबाकी भरतील जेणेकरून वीजपुरवठा खंडित होणार नाही. ढाका थकबाकी भरण्यात अयशस्वी झाल्यास त्रिपुरा सरकार वीजपुरवठा बंद करेल का, असे विचारले असता मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले. त्रिपुरामध्ये वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी अनेक यंत्रसामग्री बांगलादेशातून किंवा चितगाव बंदरातून आणण्यात आली होती. त्यामुळं कृतज्ञता म्हणून त्रिपुरा सरकारने करारानंतर देशात वीजपुरवठा सुरू केला होता. परंतु, त्यांनी देय रक्कम दिली नाही.
त्रिपुराने मार्च 2016 मध्ये बांगलादेशला वीजपुरवठा सुरु केला होता. दक्षिण त्रिपुरातील पलाताना येथे 726 मेगावॅट क्षमतेच्या सरकारी मालकीच्या ONGC त्रिपुरा पॉवर कंपनीच्या (OTPC) गॅस-आधारित पॉवर प्लांटमध्ये वीज निर्मिती केली जाते. त्रिपुरा बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेची लांबी 856 किलोमीटर आहे.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..