खोबरेल तेलामुळे तुमच्या केसांना धोका; हिवाळ्यात होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार
GH News December 24, 2024 11:09 AM

आपल्या सगळ्यांनाच लांबसडक आणि घनदाट केसांची आवड असते. मात्र आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळे तुमच्या केसांवर गंभीर परिणाम होतो. शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळे केसगळतीची समस्या, केसांमध्ये कोंडा होणे, केसांना फाटे फुटणे यांच्या सारख्या समस्या उद्भवू लागतात. परंतु आपल्या निसर्गामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या वापरामुळे तुमच्या केसांच्या सगळ्या समस्या कमी होऊ शकतात. त्यासोबतच या नैसर्गिक गोष्टींचा तुमच्या केसांवर कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. त्यापैकी एक म्हणजे खोबरेल तेल.

आता सर्वांना प्रश्न पडला असेल की खोबरेल तेलामुळे केसांना नेमकं काय फायदे होतात? खोबरेल तेलाचा वापर अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांकडून केला जातो. खोबरेल तेल केसांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर देखील मानले जाते. खोबरेल तेलामध्ये अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे केसांची वाढ तर होते त्यासोबतच त्यांच्यामध्ये नैसर्गिक चमक निर्माण होते. खेबरेल तेलाच्या वापरामुळे केसगळती कमी होते. परंतु कोणत्याही गोष्टीचा अती वापर केल्यामुळे आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.

केसांना खोबरेल तेल लावण्याचे जसे फायदे आहेत त्याचं प्रकारे जास्त प्रमाणात खोबरेल तेलाचा केसांवर वापर केल्यामुळे त्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया खोबरेल तेल केसांवर लावण्याचे तोटे नेमकं काय? हिवाळ्यामध्ये केसांच्या अनेक समस्या सुरु होतात. वातावरणातील गारव्यामुळे तुमचे केस अधिक खराब होण्याची शक्यता अस्ते. त्यासोबतच हिवाळ्यामध्ये केसांमध्ये कोंड्याचे प्रमाण वाढते. त्योसोबतच हिवाळ्यात सारखे सारखे केस धुतल्यामुळे तुमचे केस अधिक ड्राय आणि निस्तेज दिसू लागतात.

हिवाळ्यात खोबर तेल लावण्याचे फायदे

१) केसांवर खोबरेल तेलाचा वापर केल्यामुळे त्यांना भरपूर प्रमाणात पोषण मिळते आणि केस मजबूत होतात. नारळ्याच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडेट आणि प्रोटिन भरपूर प्रमाणात असतात. केसांवर खोबरेल तेलाचा वापर केल्यामुळे केस अधिक निरोगी होतात.

२) केसांवर आठवड्यातून २ वेळा खोबरेल तेल लावल्यामुळे केसांना नैसर्गिक मॉइश्चरायझ होण्यास मदत होते. हिवाळ्यात केसांवरील चमक कमी होते त्यामुळे नियित खोबरेल तेल लावल्यामुळे केसांवर चमक येते.

३) केसांवर नियमित खोबरेल तेलाचा वापर केल्यामुळे केसगळतीची समस्या दूर होते. खोबरेल तेलामधील अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे केसगळण्याचा धोका कमी करून केस घणदाट करण्यास मदत करते.

खोबरेल तेल लावण्याचे तोटे

हिवाळ्यात जास्त प्रमाणात केसांना तेल लावल्यामुळे केस अधिक चिकट होतात. त्यासोबतच तेलाचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याची शक्यता वाढते. हिवाळ्यामध्ये केसांना जास्त प्रमाणात तेलाचा वापर केल्यास केस जड होतात आणि डोकेदुखीची समस्या होऊ शकते. त्याचप्रमाणे केसांना जास्त प्रमाणात तेल लावल्यामुळे कोणत्यागही प्रकारच्या ऍलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त प्रमामात केसांवर तेलाचा वापर करू नये.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.