ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. उभयसंघातील 5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात विजयी सुरुवात केली. तर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात पलटवार करत मालिकेत बरोबरी साधली. मात्र तिसरा सामना हा पावसामुळे अनिर्णित राहिली. त्यामुळे आता चौथ्या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. चौथा सामना जिंकणारा संघ मालिका गमावणार नाही, हे निश्चित होईल. त्यामुळे दोन्ही संघात चुरस पाहायला मिळेल. अशात क्रिकेट चाहत्यांना अटीतटीचा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाचा ऑलराउंडर आर अश्विन याने तिसऱ्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे आर अश्विन याच्या जागी मुंबईकर तनुष कोटीयन याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तनुषला चौथ्या सामन्यात पदार्पणाची संधी मिळणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलिया-इंडिया चौथा कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलिया-इंडिया चौथा कसोटी सामना हा मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलिया-इंडिया चौथ्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजता सुरुवात होणार आहे. तर 4 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
ऑस्ट्रेलिया-इंडिया चौथा कसोटी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर डिज्ने-प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), तनुष कोटीयन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.
चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ट्रेव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.