मानखुर्द मंडाला कुर्ला भंगाराला भीषण आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीनंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी आग विझविण्याचे काम सुरू केले आहे.
Raigad News : रायगडमध्ये पालकमंत्रिपदावरून बॅनर वॉररायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बॅनर वॉर सुरु झाले आहे. आज सकाळी शिवसेना कार्यकर्त्यांनी भरत गोगावले यांचे तर संध्याकाळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भावी पालक मंत्री म्हणून आदिती तटकरे यांचे बॅनर लावले आहेत. गोगावले यांच्या बॅनरवर फिक्स पालक मंत्री तर आदिती यांच्या बॅनरवर भावी पालक मंत्री अशा शब्दांच्या चढाओढ दिसून येत आहेत. यामुळे आता रश्शीखेच नाही, वाद नाही अस सांगितल जात असल तरी महायुतीत रायगडच्या पालक मंत्री पदावरून जुंपण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
Kolhapur News : सलग सुट्ट्यांमुळे अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दीनाताळच्या निमित्ताने सलग सुट्ट्या असल्यानं कोल्हापुरात राज्यभरातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे अंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. पहाटेपासून पर्यटक भाविकांनी मोठ्या प्रमाणावर अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी केलीय. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, जोतिबा देवस्थान, नवीन राजवाडा या ठिकाणीही पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत.
Ambernath : अंबरनाथ रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीच्या धडकेत एकाचा मृत्यूआज दुपारी अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ एका इसमाचा रेल्वे ट्रॅक ओलांडताना मालगाडी खाली येऊन अपघात झाला. लागलीच सदर इसमास रेल्वे पोलिसांनी मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. मृत व्यक्ती हा अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला असलेल्या स्वामीनगर येथील रहिवासी आहे. तो अंबरनाथ पूर्व भागात टेलरिंग चे काम करतो. आज दुपारी तो घरी जेवायला आला होता. जेवण करून तो कामावर जात असताना रेल्वे रुळावर त्याला एका मालगाडी ने धडक दिली. या घटनेने स्वामीनगर भागात शोककळा पसरली आहे.
Maharashtra Politcs : दालनापाठोपाठ मंत्र्यांना बंगल्याचं वाटपदालनापाठोपाठ मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलं आहे.
Rahul Gandhi : राहुल गांधी नांदेड विमानतळावरून दिल्लीकडे रवानाकाँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचे नांदेड विमानतळावर पोहोचले आहेत. परभणी येथून सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन राहुल गांधी नांदेड विमानतळावर पोहोचले. नांदेड विमानतळावरुन गांधी विशेष विमानाने दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
Devendra Fadnavis : रामोशी समाजाच्या वतीने जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून केला होता नवसदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून रामोशी समाजाचे नेते दौलत शितोळे यांनी खंडोबाला नवस केला होता. जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भंडारा खंडेरायाला उधळेल असा नवस शितोळे यांनी केला होता. तो नवस पूर्ण करण्यासाठी आज जेजुरी गडावर खंडेरायाचा अभिषेक आणि महापूजा करण्यात आली. महापूजा झाल्यानंतर रामोशी समाजाच्या वतीने काही किलो भंडारा देवाला उधळत नवस पूर्ण केला आहे.
Jejuri : जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दीमहाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी जेजुरी गडावर गर्दी केली आहे. शनिवार रविवार सलग सुट्ट्या असल्याने भाविकांच्या सकाळपासूनच जेजुरी गडावर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
Beed : मंत्री मेघना बोर्डीकर बीडच्या मस्साजोगमध्ये पोहोचल्यामंत्री मेघना बोर्डीकर बीडच्या मस्साजोगमध्ये पोहोचल्या. त्यांनी पीडित देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली.
राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने परभणीत आले होते - देवेंद्र फडणवीसराहुल गांधी केवळ राजकीय हेतूने आले होते. केवळ द्वेष निर्माण करणे हाच राहुल गांधी यांचा हेतू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परभणीच्या प्रकरणावर बोलले.
Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा हैदोसनंदुरबार जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळत आहे.
गेल्या 11 महिन्यात 300 जणांना कुत्र्याचा वाचा.....
कुत्रा चावल्याने दररोज एक जण रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती.....
कुत्रा चावल्याचा घटनेत जिल्हाभरात मोठी वाढ....
मुकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी..
Rahul Gandhi Live : राहुल गांधी यांचा सूर्यवंशी कुटुंबासोबत संवाद, राज्यातील काँग्रेस नेते उपस्थितRahul Gandhi Live : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबासोबत संवाद साधला. त्यावेळी राज्यातील काँग्रेस नेते उपस्थित होते. राहुल गांधी आणि सूर्यवंशी कुटुंबाचा यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली. यावेळी राहुल गांधी यांच्यासमोर सूर्यवंशी कुटुंब भावूक झाले.
Maharashtra Live Update: गायीच्या दूधाचे अनुदान २ रूपयांनी वाढलेराज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाने गाईच्या दुधावर 5 रुपयांवरून 7 रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे .
Maharashtra Live Update: राहुल गांधी परभणीत दाखल झाले आहेत. ते सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत. परभणी शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलाय. मंगल प्रभात लोढाआज मंत्रालयाचा चार्ज घेतला आहे, आमची आता पहिली मीटिंग होणार आहे. आजपासून पूर्ण गतीने काम करणार आहोत. 100 दिवसात काय काय करणार हे मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे. 5 लाख लोकांना रोजगार देण्याचा हा पूर्ण प्रयत्न करणार आहे. Maharashtra Live Update: चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर सर्वांना न्याय मिळेल - रवी राणाअमरावतीच्या पालकमंत्री बाबत आमदार रवी राणा यांच मोठं विधान
चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर सर्वांना न्याय मिळेल - रवी राणा
अमरावती जिल्ह्याला चंद्रशेखर बावनकुळे हे पालकमंत्री मिळावे - आमदार रवी राणा यांची मागणी
विदर्भाला मुख्यमंत्रीपद मिळालं तर सक्षम व मजबूत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आहे
चांगले खाते यावेळी विदर्भाला मिळाले
चंद्रशेखर बावनकुळे यांना अमरावती जिल्ह्याचा चांगला अभ्यास आहे
चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर सर्वांना न्याय मिळेल
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रकचा टायर गरम झाल्याने टायरला लागली आग० मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रकचा टायर गरम झाल्याने टायरला लागली आग
० प्रसंगावधान राखून चालक आणि क्लिनरने केले आग विझवण्याचे प्रयत्न
० धावत्या ट्रकच्या टायरमधुन धुर येऊ लगाल्याने लागलीच ट्रक थांबवुन गरम झालेल्या टायरवर केले पाण्याचा मारा
० मदत कार्य करणारी देवदूत टिम घटना स्थळी दाखल
० आगीवर मिळवले नियंत्रण
० मोठी दुर्घटना टळली
संतोष देशमुख प्रकरणी बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय बैठक संपन्नबीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख प्रकरणात, आता बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली आहे... यावेळी देशमुख हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावं, त्याचबरोबर वाल्मीक कराड यांना खून प्रकरणात सहआरोपी करा, या प्रमुख मागणीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान पुढील दिशा ठरली असून येणाऱ्या 28 डिसेंबर रोजी बीडमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.. बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार असून शहरातील सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे चौक ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
Maharashtra Live Update: पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सारथी संस्थेच्या नव्या इमारतीची पाहणीपुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सारथी संस्थेच्या नव्या इमारतीची पाहणी
पुण्यात उभारण्यात आली आहे सारथी संस्थेची नवी इमारत
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित दादा यांच्याकडून संस्थेच्या इमारतीची पाहणी
संपूर्ण इमारतीची अधिकाऱ्यांसह अजित पवारांनी केली बारकाईने पाहणी
राज्यभरातील सारथीच्या अधिकाऱ्यांची अजित पवार घेणार बैठक
सारथीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या फेलोशिप वर होणार अधिकाऱ्यांसोबत चर्चा
Maharashtra Live Update: मंत्री संजय शिरसाठ यांनी घेतली पोलीस अधीक्षक नवनाथ कॉवत यांची भेटराज्याचे मंत्री संजय शिरसाठ यांनी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतलीय. बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख प्रकरणात त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असून आरोपींना तात्काळ अटक करा, त्याचबरोबर जे कोणी दोषी असतील त्यांच्या कडक कारवाई करा, अशी मागणी अन् सूचना देखील केल्या आहेत..
Maharashtra Live Update: बीडच्या लिंबारुई गावात शेतकऱ्याला बेदम मारहाण; दुचाकीही जाळलीबीड तालुक्यातील लिंबारुई गावात शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आलीय. विशेष या शेतकऱ्याची दुचाकी देखील जाळण्यात आली आहे. ही जगन्नाथ नांदे असं अज्ञात हल्लेखोरांनी मारहाण केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे.. पीडित शेतकरी जगन्नाथ नांदे हे रात्री शेतामध्ये असताना अज्ञात तीन व्यक्ती या ठिकाणी आले व काठीने त्यांना बेदम मारहाण केली, तसेच रस्त्यावर उभा केलेली दुचाकी देखील जाळली..दरम्यान या प्रकरणाचा तात्काळ छडा लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Maharashtra Live Update: आमचा पक्षांतर्गत प्रश्न आम्ही सोडवू, भुजबळांच्या नाराजीवर अजित पवार याचं विधान देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ दिल्लीला जाणार- छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर दिल्लीला जाणार
- दिल्लीत छगन भुजबळ अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता
- थोड्याच वेळात छगन भुजबळ दिल्लीकडे रवाना होणार, सूत्रांची माहिती
- दिल्लीतून भुजबळ परदेशात जाणार
- १० दिवस भुजबळ परदेशात
Navi Mumbai: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे नवी मुंबईत जल्लोषात स्वागतवाशी टोल नाका जवळ करण्यात आले भव्य स्वागत.
ढोल ताश्यांचा गजर, जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत करण्यात आले.
अधिकाधिक बालकांसाठी आणि महिलांसाठी विशेष काम करण्याचा प्रयत्न राहील.
जिथून निवडून आलोय त्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नेतृत्व करण्याची संधि मिळावी अशी इच्छा प्रत्येकाची असते. याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील मात्र महायुतीचे मंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत.
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भीमथडी जत्रेला देणार भेटमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भीमथडी जत्रेला भेट देणार आहेत.
कालच शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले होते.
गावखेड्याची संस्कृती आणि खाद्य संस्कृतीची ओळख म्हणून भीमथडी जत्रेच आयोजन केलं आहे.
रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांच्या माध्यमांतून भीमथडी जत्रा सुरू करण्यात आली आहे.
याच ठिकाणी आज मुख्यमंत्री भेट देणार आहेत.
Wardha: नाकेबंदी करत स्विफ्ट कारमधुन मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूसाठा जप्तवर्ध्याच्या देवळी परीसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय महिलेच्या आधारे केलेल्या नाकेबंदीत एक स्विफ्ट कारला अडवले असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचा साठा मिळून आला. याप्रकरणी पोलिसांनी 6 लाख 75 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ जालन्यात 27 डिसेंबर रोजी काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चाजालन्यात 27 डिसेंबर रोजी काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिलीय.
दरम्यान या मोर्चाला हजारोच्या संख्येने सहभागी होण्याच आवाहन करण्यात आलंय.
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आज नांदेड आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावरकाँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे आज नांदेड आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी एक वाजता राहुल गांधी यांचे नांदेड विमानतळावर आगमन होणार आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळा बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. राहुल गांधी हे परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करणार आहेत. राहुल गांधी यांच्या सोबत काँग्रेसचे मोठे नेते देखील उपस्थित राहणार आहेत. नांदेड विमानतळावरुन राहुल गांधी हे बाय रोडने परभणीकडे जाणार आहेत.
पुणे पोलिसांची मोठी कारवाईघरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात दगड मारून रेल्वेने पळून गेलेल्या फरार आरोपी पतीला गुन्हे शाखा युनिट -6 च्या पोलिसांनी मनमाड रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेलते आहे. कैलास गणपत जाधव, (वय 44, रा. केसनंद फाटा, वाघोली, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर पद्मिनी कैलास जाधव, (वय 40) असे जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. पद्मिनी जाधव यांची प्रकृती अद्याप गंभीर असून बेशुद्ध अवस्थेत ससून रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Maharashtra Live Update: लग्नसराई व सुट्यांमुळे तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दीलग्नसराई व ऐकीकडे नाताळच्या सुट्या यामुळे तुळजापूर नगरी भाविकांनी गजबजून गेली आहे.लग्न कार्यानंतर कुलधर्म कुलाचार पुजा करण्यासाठी नवदांपत्यांनी तुळजापूरात गर्दी केली आहे तसेच नाताळ सुट्यांच्या पाश्र्वभूमीवर पुढील आठ दिवसाचे अभिषेक पुजेचे बुकींग फुल्ल झा आहे.मागील काही दिवसापासून लग्न तिथी मोठ्या प्रमाणावर आहेत शुभ कार्यानंतर कुलदैवतांच्या दर्शनासाठी येण्याची प्रथा आहे.त्यामुळे भाविक अभिषेक पुजा,जागरण गोंधळासाठी मोठी गर्दी करत असल्याने तुळजापुर नगरी भाविकांनी गजबजून गेली आहे.
Maharashtra Live Update: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली वाघोली अपघताची माहितीउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली वाघोली अपघताची माहिती
अपघताची कारणे, रुग्णालयात दाखल झालेल्या इतर जखमींची अजित पवार यांनी घेतली माहिती
दुपारी अजित पवार अपघातस्थळी भेट देण्याची शक्यता
आज अजित पवार कोरेगाव भीमा या ठिकाणी आढावा घेण्यासाठी जात असताना वाघोली अपघातस्थळी भेट देण्याची शक्यता
Crime News : नांदेड जिल्ह्यातील 40 जण हद्दपार,तर 12 जण तुरुंगातनांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी नांदेड पोलिसांनी "ऑपरेशन फ्लश आऊट' या मोहिमे अंतर्गत अनेक गुन्हेगारांवर कारवाई केली आहे.मागील वर्षभरात 13 टोळ्यातील 40 जणांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले असून 12 जणांना एमपीडीए कायद्याअंतर्गत एका वर्षासाठी तुरुंगात टाकण्यात आले आहे.त्याच बरोबर 230 जणांवर विविध गुन्ह्यानुसार कारवाईसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
Dharashiv: कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटीधाराशिवच्या कळंब शहरात ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने रस्त्यावर ऊस सांडून शेतकऱ्याचे नुकसान झाल आहे.
दरम्यान ढोकी रोडवरुन येणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली छञपती शिवाजी महाराज चौकाजवळ मुख्य रोडवरच पलटी झाली.
यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली. माञ ट्रॉलीमधील ऊस रस्त्यावर सांडल्याने ऊसाचा खच तयार झाला.
दरम्यान यामुळे बराच वेळ वाहतुक देखील खोळंबली होती.
Sangli Bank Fraud: बेदाणा युनिटच्या नावाखाली बँकेची दोन कोटींची फसवणूक, ७ जणांवर गुन्हा दाखलबेदाणा प्रोसेसिंग युनिट आणि पॅकेजिंग प्रकल्प उभा करण्याच्या नावाखाली एचडीएफसी बँकेची १ कोटी ९८ लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सात जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकेचे सहउपाध्यक्ष रवींद्र बाळासाहेब कुलकर्णी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar: कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले क्रीडा संकुलाचे 21 कोटी रुपयेविभागीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैक खात्यातील 21 कोटी 59 लाख 38 हजार 287 रुपये दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या खात्यात वळते करून हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीनंतर जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
Ulhasnagar News: उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचा हलगर्जीपणा, महिला रुग्णांना फरशीवरच गादी टाकून उपचारउल्हासनगरमधील एकमेव शासकीय जिल्हा रुग्णालय म्हणजे येथील मध्यवर्ती रुग्णालय. या रुग्णालयात उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा तसेच मुरबाड अशा ग्रामीण भागातून रुग्ण उपचारासाठी मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे रुग्णाची वाढती संख्या आणि रुग्णालयात असणारी सुविधा अपुरी पडत आहे. दरम्यान या रुग्णालयात महिला कक्ष ५-६ मध्ये ६० बेडची सुविधा असून सध्या या वॉर्डमध्ये सद्यस्थितीत १२० महिला उपचार घेत आहेत.
Pune Accident: पुण्यत भीषण अपघात; भरधाव डंपर चालकाने ९ जणांना चिरडलंअमरावतीवरून नोकरीसाठी पुण्यात आलेल्या 9 जणांना पुण्यात डंपरने चिरडले. पुण्यात काम शोधण्यासाठी आले, डोक्यावर छत नाही, खिशात पैसे नाहीत, त्यामुळे रात्र फुटपाथवर काढण्याचा विचार केला. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले. यामध्ये 3 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ चालकाला बेड्या ठोकल्यात. त्याची चौकशी सुरू आहे.