Merry Christmas Wishes In Marathi : प्रेम, सत्य, दया शिकवणारा नाताळ! हे संदेश पाठवून द्या ख्रिसमसच्या शुभेच्छा
Times Now Marathi December 25, 2024 03:45 AM

Happy Christmas 2024 Wishes Messages SMS, Quotes In Marathi : ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्माचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी प्रभु येशूचा जन्म झाला असे या धर्मातील मान्यता आहे. ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्माचा सण असला तरी हा सण जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने लोक एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतात. या विशेष दिवशी अनेक भेटवस्तूंची देखील देवाण-घेवाण केली जाते. लोक अनेक प्रकारे आपल्या प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतात. कोणी शुभेच्छा पाठवतात, कोणी येशू ख्रिस्ताचे कोट पाठवतात तर कोणी संदेशाद्वारे शुभेच्छा देतात. तुम्हाला या हा ख्रिसमसला खास बनवायचा असेल तर तुम्ही तुमच्या प्रियजनांना ख्रिसमसनिमित्त येथे दिलेले शुभेच्छा संदेश, कोट्स आणि इमेजेस पाठवू शकता.

प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येकासाठी प्रेम,
प्रत्येक दिवस आनंदाचा सण घेऊन येईल,
या आशेने सर्व दु:ख विसरू या....
आपण सर्वांनी नाताळचे स्वागत करू या.
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा! मेरी ख्रिसमस!

--------------------------------------------------------------------

प्रेम, सत्य, दया, संदेश देणारा नाताळ निमित्त
मनःपूर्वक शुभेच्छा! मेरी ख्रिसमस!

हा नाताळ सण तुमच्यासाठी घेऊन येवो
अक्षय्य सुखाची आणि आनंदाची अमुल्य भेट,
आपण सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!
मेरी ख्रिसमस!

--------------------------------------------------------------------

ख्रिसमस आनंददायी वातावरणाने आपले
जीवन तेजस्वी आणि प्रकाशमान होत जावो.
याच आपणाला नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.
मेरी ख्रिसमस!

--------------------------------------------------------------------

येशूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहो,
आपल्या जीवनात प्रेम, सुख, समृद्धी येवो..
नाताळच्या मन:पूर्वक शुभेच्छा
मेरी ख्रिसमस!

सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो
तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा! मेरी ख्रिसमस!

--------------------------------------------------------------------

आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हाला हा ख्रिसमसचा सण आनंदाचा जाओ
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा! मेरी ख्रिसमस!

--------------------------------------------------------------------

आला पाहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी असू दे
नाताळच्या शुभेच्छा! मेरी ख्रिसमस!

वात्सल्याचा सुंगध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशुला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला.
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.
मेरी ख्रिसमस!

ख्रिसमस म्हणजे प्रेम,
ख्रिसमस म्हणजे आनंद,
ख्रिसमस हा उत्साह आहे,
ख्रिसमस हा नवीन उत्साह आहे.
तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा

--------------------------------------------------------------------

प्रभूचा आशीष अवतरला नव साज घेऊनी,
आता द्या आणि घ्या प्रेमच प्रेम भरभरुनी
नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा! मेरी ख्रिसमस!.

मी कार्ड पाठवत नाही
मी फुलं पाठवत नाही,
फक्त ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या
मी शुभेच्छा पाठवत आहे.
मेरी ख्रिसमस!.

--------------------------------------------------------------------

प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येकासाठी प्रेम असेल
येणारा प्रत्येक दिवस आनंद घेऊन येईल
या आशेने सर्व दु:ख विसरू या
सर्व एकत्र मिळून नाताळचे स्वागत करूया...
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा! मेरी ख्रिसमस!

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.