'आई कुठे...' फेम कौमुदीच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात; ग्रहमखसाठी नेसली या अभिनेत्रीने दिलेली साडी
esakal December 24, 2024 07:45 PM

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र या मालिकेतील प्रत्येक पात्र अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यातील यशच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कौमुदी वालोकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिचा ग्रहमख विधी नुकताच पार पडलाय. तिने या सोहळ्याचे काही सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.यात ती नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत आहे. हे फोटो पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.

कौमुदीच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात

कौमुदी हिने काही महिन्यांपूर्वी साखरपुडा केला होता. त्यानंतर तिने मित्रमंडळींसोबत बॅचलर्स पार्टी देखील केली. तर 'आई कुठे काय करते' या मालिकेतील कलाकारांनीच तिचं केळवण अत्यंत थाटामाटात केलं होतं. आता कौमुदीच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झालीये. तिने तिच्या ग्रहमख विधीचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. तिच्या फोटोवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.

या अभिनेत्रींची हजेरी

कौमुदीच्या लग्नविधींना दोन अभिनेत्रींनी हजेरी लावलीये. अभिनेता शशांक केतकर याची बहीण दीक्षा केतकर आणि अभिनेत्री अश्विनी महांगडे या दोघीही कौमुदीच्या घरी हजर आहेत. दीक्षाने 'तू सौभाग्यवती हो' या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. त्या दोघीही ग्रहमख सोहळ्यापासूनच कौमुदीची मदत करताना दिसतायत. कौमुदीने सुरेख पोपटी रंगाची साडी नेसली असून तिला ही साडी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने भेट दिलेली आहे. तिच्या डोक्यावर मुंडावळ्या शोभून दिसत आहेत.

आता कौमुदी कधी लग्नबंधनात अडकणार यांच्याकडे चाहत्यांचा लक्ष लागलं आहे. तर काहींना तिच्या लग्नातील लूक पाहण्याची घाई झालीये. आता येत्या २ दिवसातच कौमुदी बोहोल्यावर चढेल हे मात्र नक्की.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.