Marathi Entertainment News : सार्वजनिक कार्यक्रमांना मराठी कलाकारांची हजेरी काही नवी नाही. संक्रांतीचा सण जवळ आलाय. हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मराठी अभिनेत्री या कार्यक्रमांना हजेरी लावतात. दहीहंडी, नवरात्र, गणेशोत्सवातील कार्यक्रमातही मराठी अभिनेत्रीची हजेरी पाहायला मिळते. इतकंच नाही तर दुकानाच्या, व्यवसायाच्या उदघाटनाला कलाकार हजेरी लावतात. पण यासाठी ते तितकंच मोठं मानधन घेतात हे तुम्हाला माहितीये का ?
एखाद्या जवळच्या व्यक्तीचा सभारंभ सोडल्यास जवळपास सगळ्याच कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी कलाकार काही रक्कम मानधन स्वरूपात घेतात. अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींना यावेळी मागणी जास्त असतात. सार्वजनिक समारंभात काही मिनिट किंवा काही तास हजेरी लावण्यासाठी मराठी किती मानधन घेतात आणि या सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री कोण आहे जाणून घेऊया.
सार्वजनिक समारंभात हजेरी लावण्यासाठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका असलेली अभिनेत्री क्रांती रेडकर अंदाजे 1 लाख रुपये मानधन घेते. सोशल मीडियावर ती या समारंभाचे फोटोही शेअर करत असते.
माहेरची साडी फेम अलका कुबल कोणत्याही समारंभाला हजेरी लावण्यासाठी जवळपास एक ते एक लाख पंचवीस हजार इतकं मानधन घेतात. बऱ्याच महिलांच्या सभारंभाना, प्रदर्शनांच्या उदघाटन सभारंभाना त्यांना आवर्जून बोलावलं जातं.
सध्या सिनेमात फार दिसली नसली तरीही संस्कृती बालगुडेची लोकप्रियता चाहत्यांमध्ये खूप आहे. संस्कृती कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी अंदाजे दीड ते दोन लाख रुपये इतकं मानधन आकारते.
मराठी मालिका आणि सिनेमाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असणाऱ्या श्रुती मराठेने साऊथ इंडस्ट्रीतही स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. श्रुती एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी अंदाजे दीड लाख रुपये मानधन आकारते. अखेरची ती गुलाबी आणि देवरा या सिनेमांमध्ये दिसली होती.
अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी पंडित सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी दोन लाख रुपये अंदाजे मानधन घेते. लवकरच तिचा ये रे ये रे पैसा 3 हा सिनेमा रिलीज होणार आहे.
महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी कोणत्याही कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी साधारण अडीच ते तीन लाख रुपये अंदाजे मानधन आकारते. अखेरचा डेट भेट हा सिनेमा रिलीज झाला. पण त्यानंतरचे तिचे सगळे सिनेमे रिलीजची प्रतीक्षा करत आहेत. मोगलमर्दिनी ताराराणी, रावसाहेब, रेनबो आणि परिणीती अशी तिच्या या सिनेमांची नाव आहेत.
महाराष्ट्राची क्रश प्राजक्ता माळी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींनपैकी एक आहे. सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी प्राजक्ता चार लाख रुपये अंदाजे मानधन घेते. नुकताच प्राजक्ताचा फुलवंती सिनेमा रिलीज झाला यामुळे तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे.
सैराट गर्ल रिंकू राजगुरूसुद्धा सर्वाधिक मानधन घेते. कार्यक्रमातील काही मिनिटांच्या काही तासांच्या हजेरीसाठी रिंकू चार लाख रुपये अंदाजे मानधन घेते.