क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम मॅनजमेंटने बॉक्सिंग डे टेस्टसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 26 ते 30 डिसेंबर दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळवण्याच येणार आहे. हा सामना सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन येथे पार पडणार आहे. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन देण्यात आली आहे. उभयसंघातील या मालिकेत एकूण 2 सामने होणार आहेत.
शान मसूद हा पाकिस्तानचं या मालिकेत नेतृत्व करणार आहे. टेम्बा बावुमा याच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची धुरा आहे. दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बोश हा पदार्पण करणार आहे. टीम मॅनजमेंटने कॉर्बिनवर विश्वास दाखवत संधी दिली आहे. कॉर्बिनने आतापर्यंत 34 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये 1 हजार 295 धावा केल्या आहेत. तसेच 72 विकेट्स घेतल्या आहेत. बॉशने पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यातून पदार्पण केलं होतं. बॉशने त्या सामन्यात 40 धावा करुन 1 विकेटही घेतली होती.
पहिला सामना, 26 ते 30 डिसेंबर, सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन
दुसरा सामना, 3 ते 7 जानेवारी, न्यूलँड्स केपटाऊन
दरम्यान दक्षिण आफ्रिकेची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळीतील शेवटची मालिका आहे. दक्षिण आफ्रिका या साखळीत पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायलनमध्ये पोहचण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे. तसेच या मालिकेकडे टीम इंडियासह ऑस्ट्रेलियाचं लक्ष असणार आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी या तिन्ही संघांमध्ये चुरस आहे. अशात पाकिस्तानने ही मालिका जिंकल्यास भारत आणि ऑस्ट्रेलियासाठी ते फायदेशीर ठरणार आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन: टेम्बा बावुमा (कॅप्टन), टोनी डी झॉर्झी, एडन मार्रक्रम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन, मार्को यानसेन, कगिसो रबाडा, डेन पॅटरसन आणि कॉर्बिन बॉश.
कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम : शान मसूद (कॅप्टन), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, हसीबुल्लाह (विकेटकीपर), कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अब्बास, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), नसीम शाह , नोमान अली, सॅम अयूब आणि सलमान अली आगाह.