बारामती : ‘‘आमदार रोहित पवार यांनी नागपूर येथे माझा सत्कार केला. त्यावेळेस त्यांना मी सांगितलं होतं की, ‘सत्कार करायचा असेल तर तुमच्या पिंपळी (ता. बारामती) येथील घरी करायला हवा.’ त्यानुसार त्यांनी बारामतीच्या घरी सत्कार करण्याचे कबूल केले होते. त्यानंतरच मी त्यांचा सत्कार स्वीकारला होता.
मात्र, आज मी बारामतीत आलोय, पण त्यांच्याकडून अजून कसलंही निमंत्रण नाही. घरी बोलावून माझा सत्कार करण्याची संस्कृती त्यांनी जोपासायला हवी,’’ अशा शब्दांत विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपली भावना बोलून दाखवली.
कण्हेरीच्या मारुतरायाचे दर्शन घेण्यासाठी प्रा. शिंदे आले होते. ते म्हणाले, ‘‘विधानसभेच्या निवडणुकीत कर्जत जामखेडमध्ये जी लढत झाली ती पूर्वनियोजित नुरा कुस्ती होती, मला दगाफटका झाला, मला लक्षात आले नाही, निकालानंतर नुरा कुस्ती आहे, असे वारंवार सांगितले गेले.’’