बातम्यांमधील स्टॉक : भारत फोर्ज, Nalco, पॅनेसिया बायोटेक, Amber Enterprises, बीपीसीएल
ET Marathi December 26, 2024 11:45 AM
मुंबई : बाजाराशी संबधीत अनेक घडामोडी आणि बातम्यांच्या आधारावर आज कोणत्या शेअर्सवर ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. अशा शेअर्सची माहिती आपण घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने भारत फोर्ज, नाल्को, पॅनेसिया बायोटेक, अंबर एंटरप्रायझेस या शेअर्सचा सामावेश आहे. भारत फोर्जBharat Forge कंपनीने तिच्या संपूर्ण मालकीच्या भारत फोर्ज ग्लोबल होल्डिंग जीएमबीएच (BFGH) मध्ये युरो 39 दशलक्ष ( 345 कोटी) ची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. नाल्कोNalco ने उत्कल-डी आणि उत्कल ई-कोल ब्लॉकसाठी कोळसा उत्पादन क्षमता 4 एमटीपीए पर्यंत वाढवण्यासाठी खाण लीज करारावर स्वाक्षरी केली. लीज डीड 21 एप्रिल 2051 पर्यंत वैध आहे. बीपीसीएलNTPC च्या 150 MW ISTS-कनेक्टेड सोलर PV पॉवर प्रकल्पासाठी BPCL सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली. प्रकल्पाची अंदाजे किंमत 756.45 कोटी रुपये आहे. पॅनेसिया बायोटेकPanacea Biotec ला आर्थिक वर्ष 2025 मध्ये 14.95 दशलक्ष डॉलर (127 कोटी) किमतीच्या बायव्हॅलेंट ओरल पोलिओ लसीचे (bOPV) 115 दशलक्ष डोस पुरवल्याबद्दल UNICEF कडून पुरस्कार पत्र प्राप्त झाले. अंबर एंटरप्रायझेसAmber Enterprises कंपनी आपल्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे डिमर्जिंग करणार आहे. रामकी इन्फ्रास्ट्रक्चरRamky Infrastructure ला हैदराबाद मेट्रोपॉलिटन वॉटर सप्लाय अँड सीवरेज बोर्डाकडून 215.08 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी स्वीकृती पत्र (LoA) प्राप्त झाले. अपोलो हॉस्पिटल्सApollo Hospitals ची उपकंपनी अपोलो हेल्थको 67.5 कोटी रुपयांना सर्चलाइट हेल्थकडून सॉफ्टवेअर व्यवसाय विकत घेणार आहे.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.