नवीन वर्षात गुंतवणूक करायचीय? कुठं मिळेल कमी काळात अधिक नफा? ‘हे’ आहेत 5 पर्याय
Marathi December 27, 2024 12:25 AM

अल्प मुदतीची गुंतवणूक: अलिकडच्या काळात गुंतवणुकीचं (Investment) महत्व वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी लोक विविध ठिकाणी गुंतवणूक करत आहेत. दरम्यान, गुंतवणूक करताना दोन गोष्टी महत्वाच्या मानल्या जातात. एक म्हणजे तुम्हाला मिळणारा परतावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची गुंतवणूक सुरक्षीत असणे. दरम्यान, पुढच्या पाच दिवसांनी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. या नवीन वर्षात तुम्ही देखील गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.

जर तुम्ही अल्प मुदतीच्या गुंतवणुकीसाठी चांगले पर्याय शोधत असाल, तर तुमच्यासाठी आज 5 पर्यायाबद्दलची माहिती सांगणार आहोत. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. तुम्ही जर पैसे गुंतवत असाल तर ते अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांसह गुंतवा. तुम्हाला कधीही पैशांची गरज भासल्यास, तुम्ही ज्या पर्यायांमध्ये अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करत आहात ते तुम्ही रिडीम करू शकता. यामुळे तुम्हाला दीर्घकालीन योजनांना हात लावावा लागणार नाही.

आवर्ती ठेव

जर तुम्हाला दर महिन्याला थोडे पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही रिकरिंग डिपॉझिटचा पर्याय निवडू शकता. ही योजना एक प्रकारची पिगी बँकेसारखी आहे, ज्यामध्ये तुम्हाला दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते. मॅच्युरिटीवर तुम्हाला व्याजासह एकूण रक्कम मिळते. RD मध्ये तुम्ही 1 वर्षापासून विविध कालावधीचे पर्याय निवडू शकता. तुम्हाला सर्व बँकांमध्ये आरडी सुविधा मिळेल. तुम्ही विविध बँकांमधील RD वर उपलब्ध व्याजदरांची तुलना करा आणि तुम्हाला जास्त व्याज मिळेल तिथे पैसे गुंतवा. तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये RD चा पर्याय देखील मिळतो, परंतु तेथे त्याचा कालावधी 5 वर्षे आहे.

बँक एफडी

जर तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करायची असेल तर तुम्ही FD चा पर्याय निवडू शकता म्हणजेच मुदत ठेव. गुंतवणुकीचे अनेक पर्याय असूनही, FD हा अतिशय पसंतीचा पर्याय मानला जातो. तुम्ही कोणत्याही बँकेत 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंत FD मिळवू शकता. वेगवेगळ्या कालावधीनुसार व्याजदर देखील बदलतात. त्याच वेळी, पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला 1 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत FD चा पर्याय मिळतो, तुम्ही तो देखील निवडू शकता. एफडी मिळवण्यापूर्वी बँका आणि पोस्ट ऑफिसच्या व्याजदरांची तुलना करा, त्यानंतर एका वर्षासाठी एफडी मिळवा.

डेट म्युच्युअल फंड

जर तुम्हाला एका वर्षासाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही डेट म्युच्युअल फंडाचा पर्याय देखील निवडू शकता. त्यात 12 महिन्यांसाठी पैसे गुंतवू शकता. डेट फंडात तुम्ही जी काही गुंतवणूक केली असेल ती सुरक्षित ठिकाणी गुंतवली जाते. साधारणपणे, डेट फंडांची मुदत परिपक्वता तारीख असते. यामध्ये तुम्हाला खूप चांगले रिटर्नही मिळू शकतात.

SIP

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बाजारात अल्प मुदतीसाठी SIP देखील सुरू करु शकता. यामध्ये देखील, तुम्ही तुमच्या बजेटनुसार दरमहा एक निश्चित रक्कम जमा करु शकता आणि ही SIP बंद करुन तुम्हाला पाहिजे तेव्हा तुमचे पैसे वापरू शकता. एसआयपीमधील विविध योजनांमधून तुम्हाला चांगले परतावा मिळू शकतो. साधारणपणे तज्ज्ञ त्याचा सरासरी परतावा 12 टक्के मानतात. पण ते बाजाराशी निगडीत असल्यामुळे त्यात जोखीम असते, त्यामुळे परताव्याची खात्री देता येत नाही.

कॉर्पोरेट एफडी

अनेक कंपन्या त्यांच्या व्यवसायासाठी बाजारातून पैसे गोळा करतात आणि त्यासाठी ते एफडी जारी करतात. हे बँक एफडी प्रमाणेच कार्य करते. यासाठी कंपनी एक फॉर्म जारी करते, जो ऑनलाइनही भरता येतो. कॉर्पोरेट FD मधील व्याजदर बँक FD पेक्षा जास्त आहे. कॉर्पोरेट एफडीच्या बाबतीत जोखीम बँक एफडीच्या तुलनेत थोडी जास्त आहे. परंतु मजबूत आणि उच्च दर्जाच्या कंपन्यांच्या एफडीमध्ये कमी धोका असतो. साधारणपणे कॉर्पोरेट एफडीचा परिपक्वता कालावधी 1 ते 5 वर्षांपर्यंत असतो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणताही कालावधी निवडू शकता. उच्च रेटिंग असलेल्या कंपन्या सर्व कालावधीच्या कॉर्पोरेट एफडीवर 9.25 टक्के ते 10.75 टक्के व्याजदर देतात.

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.