Pune: पुणे जिल्ह्यात कर्जाला कंटाळुन तरूण शेतकऱ्याने संपवले जीवन!
esakal December 27, 2024 02:45 PM

Latest Junnar News | येथे कर्जबाजारी पणाला कंटाळुन एका तरूण शेतकर्याने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.

ही घटना बुधवारी दुपारी साडे तीन वाजे दरम्याण उघडकीस आली असुन प्रकाश (पप्पू) दत्तात्रय सस्ते वय.३३ रा.उदापूर ता.जुन्नर असे मयत शेतकर्याचे नाव आहे.त्यानी घरा पासून थोड्या अंतरावर चिक्कूच्या झाडाला दोरीच्या मदतीने फाशी घेतली आहे.

याबाबत त्यांचे नातेवाईक व अविवाहित भाऊ निखील सस्ते यांनी संयुक्तपणे माहिती दिली कि प्रकाश सस्ते हा अल्पभूधारक शेतकरी होता.त्याला एक एकर शेती होती तसेच तो खंडाने (मक्त्याने) सात एकर शेती करत होता.कमी शेती असल्याने तो शेतीसह जोडधंदा म्हणून पशुपालन (गाई पालन) करून दुधाचा व्यावसाय ही करायचा.

शेतीसाठी आणि दुधाच्या व्यवसाया करण्यासाठी त्याने जमिनीवर पतसंस्थाकडुन कर्ज घेतले होते.तसेच हात उसने ही खुप पैसे घेतले होते.गेल्या काही महिन्या पासून दुधाचे दर ही कोसळले असल्याने त्याचे आर्थिक गणीत चूकत चालले होते.त्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी त्याने आठरा गाईन पैकी दहा गाई विकल्या पण होत्या.

मात्र तरी ही कर्जाचा बोजा वाढतच चालला होता.त्यामुळे आपले व आपल्या कुटुंबाचे कसे होणार याची चिंता त्यास होती.आपले आई,वडिल,भाऊ,पत्नी, दोन लहान मुले यांचे भविष्यात कसे होणार याची चिंता त्यास सतावत असल्याने गेले काही दिवसापासुन सस्ते तनावात व आर्थिक विवंचणेत होते.याच तणावा खाली त्यानी हे आत्महत्येचे पाऊल उचलले असावे असा अंदाज सर्वाकडून व्यक्त केला जात आहे.

जुन्नर तालुक्यातील बागायतीदार शेतकरी गेल्या काही वर्षा पासुन बाजारभाव व नैसर्गिक आपतीमुळे अडचणीत आले आहे याचे हे जीवंत उदाहरण आहे.या आधी ही तरूण शेतकर्यानी कर्ज बाजारी पणाला कंटाळुन आत्महत्य केल्याची उदाहरणे तालुक्यात घडली आहे.

या घटने बाबत ओतूर पोलीसाना मयताचे वडिल दत्तात्रय महादू सस्ते यानी खबर दिली असुन पोलीसानी आकस्मीत मयत म्हणुन नोंद केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक एल.जी.थाटे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस करीत आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.