उल्हासनगर : विशाल गवळी या नाराधमाने कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्यावर तो मानसिक दृष्टीने फिट आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी त्याला उल्हासनगरातील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते.आरोपी विशाल गवळी हा मानसिक दृष्ट्या फिट असून त्याला सायकीएट्रिक ट्रीटमेंटची गरज नाही, असा गोपनीय रिपोर्ट डॉक्टरांनी दिला आहे.त्यामुळे अत्याचार-हत्या प्रकरणात गवळी याच्या अडचणी वाढल्या आहेत.
कुख्यात विशाल गवळी याने याआधीच्या काही प्रकरणांमध्ये मनोरुग्ण असल्याचं सर्टिफिकेट देऊन जामीन मिळवला होता.त्यामुळे या प्रकरणात त्याची पुन्हा एकदा मानसिक आरोग्याची चाचणी घेणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं होत.त्याअनुषंगाने पोलीस बंदोबस्तात विशाल याला शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात वैद्यकीय तपासणीकरिता आणण्यात आले होते.डॉक्टरांनी तो मानसिक दृष्ट्या फिट असल्याचा रिपोर्ट दिला आहे.
विशाल गवळी हा "वेल ओरिएंटेड, कॉन्शियस, को-ऑपरेटिव्ह, ओरिएंटिंग टू टाइम, प्लेस" असल्याचं डॉक्टरांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. तसंच त्याला कोणत्याही सायकिएट्रिक ट्रीटमेंटची गरज नसून त्यामुळेच तसं ओपिनियन देखील डॉक्टरांनी दिलेलं नाही. त्यामुळे हा नराधम मनोरुग्ण नसून मानसिक दृष्ट्या फिट असल्याचे स्पष्ट झाल्याने विशाल गवळी अडचणीत आला आहे.