Former PM Manmohan Singh Funeral Live updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलं डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन
esakal December 27, 2024 02:45 PM
Former PM Manmohan Singh Funeral Live updates: राष्ट्रपती भवनावरचा राष्ट्रध्वज उतरवण्यात आला खाली

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानिमित्त राष्ट्रपती भवनावरचा राष्ट्रध्वज खाली उतरवण्यात आला आहे.

Former PM Manmohan Singh Funeral Live updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलं डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाच दर्शन घेतलं. त्यांच्या निवासस्थानी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली

Former PM Manmohan Singh Funeral Live updates: अँटनी ब्लिंकन वाहिलीं मनमोहन सिंघांना श्रद्धांजली

"भारत-अमेरिका जवळ आणण्यासाठी मनमोहन सिंग यांचे स्मरण केले जाईल" असे अँटनी ब्लिंकन मनमोहन सिंघांना श्रद्धांजली वाहतांना म्हणाले.

Former PM Manmohan Singh Funeral Live updates: मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी होणार अंत्यसंस्कार?

मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी म्हणजेच उद्या अंत्यसंस्कार केले जातील. त्याविषयीची अधिकृत घोषणा आज केला जाईल असे म्हटले जात आहे.

Raj Thackeray on Manmohan Singh: राज ठाकरेंनी वाहिली मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली

https://www.facebook.com/story.php?story_fbid=1143733970446838&id=100044307376010&rdid=4EUJrJNuFYBm6jAx Former PM Manmohan Singh Funeral Live updates: डॉ. मनमोहन सिंग आणि शिवाजी विद्यापीठाचा शानदार पदवीदान समारंभ; 'त्या' घटनेला 30 वर्षे झाली पूर्ण Former PM Manmohan Singh Funeral Live updates: डॉ मनमोहन सिंग यांनी संसदेतील चर्चांचा स्तर उंचावला: राज्यपाल सी पी राधाकृष्णन

महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी आणि संसदपटू होते.

अर्थमंत्री या नात्याने भारतीय अर्थव्यवस्थेच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि जागतिकीकरण व उदारीकरणाच्या मार्गावर नेले.

Former PM Manmohan Singh Funeral Live updates: राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी - उपमुख्यमंत्री अजित पवार

भारतासारख्या विकसनशील देशाला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या वाटेवर नेण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणारे आणि तो निर्णय कमालीचा यशस्वी करुन दाखवणारे देशाचे माजी पंतप्रधान, जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहनसिंह यांचं निधन ही देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी आहे. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा पाया डॉ. मनमोहनसिंह यांनी रचला. गेल्या अनेक दशकात आलेल्या प्रत्येक जागतिक मंदीसमोर भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिली, याचं बहुतांश श्रेय डॉ. मनमोहनसिंह यांनी देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्याकाळात घेतलेल्या दूरदष्टीपूर्ण निर्णयांना आहे, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी डॉ. मनमोहनसिंह यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना आदरांजली वाहिली.

Former PM Manmohan Singh Funeral Live updates: देशाने एक जागतिक दर्जाचा अर्थतज्ज्ञ विद्वान गमावला- रामदास आठवले

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची अर्थतज्ज्ञ म्हणून कामगिरी जागतिक दर्जाची होती.त्यांच्या निधनाने भारत देशाची मोठी हानी झाली आहे.देशाने एक जागतिक दर्जाचा अर्थतज्ज्ञ विद्वान गमावला आहे असे रामदास आठवले म्हणाले

Manmohan Singh: मनमोहन सिंग त्यांचे हिंदी भाषण नेहमी उर्दू लिपीत का लिहित असत? Former PM Manmohan Singh Funeral Live updates : मनमोहन सिंग निळी पगडी का घालत होते? Former PM Manmohan Singh funeral Live updates: मनमोहन सिंहांच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्रात भाजप शिल्लक राहिली, नाहीतर आज चित्र वेगळं असतं Former PM Manmohan Singh funeral Live updates : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.