साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनची चित्रपटातील केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे.'पुष्पा 2' चित्रपट सुकुमार दिग्दर्शित आहेत. या चित्रपटाने तीन आठवड्यात छप्परफाड कमाई केली आहे. या चित्रपटानेरेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाच्या 21व्या दिवसाची कमाई जाणून घेऊयात.
'2'चित्रपटाची क्रेझ जगावर पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात 264.8 कोटी रुपये कमावले. अखेर तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी 'पुष्पा 2' चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाने '2' चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. आता 'पुष्पा 2: द रुल'ने रिलीजच्या 21 व्या दिवशी 19.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच 21 दिवसांत 1100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
'पुष्पा 2' चित्रपट पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. यात तेलुगु, , तामिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांचा समावेश आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाने 21 दिवसांत तेलगूमध्ये 316.3 कोटी रुपये, हिंदीमध्ये 716.65 कोटी रुपये, तामिळमध्ये 55.35 कोटी रुपये, कन्नडमध्ये 7.48 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 14.07 कोटी रुपये कमावले आहेत.
'पुष्पा 2' चित्रपटाने जगभरात 1500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाच्या कमाईचा वेग वाढत जात आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमुळे चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळणार आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2'चा डंका पाहायला मिळत आहे.