मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाच वातावरण आहे. लोकांच्या मनात रोषाची भावना आहे. आज या विषयी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी टीव्ही 9 मराठीवर विस्तृत आपलं मत व्यक्त केलं. बीड जिल्ह्यात आज काय वातावरण आहे? यावर बोलताना संदीप क्षीरसागर म्हणाले की, “एकीकडे लोक घाबरलेले आहेत, पण त्यांच्या मनात रोष आहे. आज या घटनेमुळे जिल्ह्यात सर्व पक्षाचे लोक एकत्र आलेले आहेत. मी कोणात्याही गटाचा नाही. पण एक सर्वसामान्य माणूस, लोकप्रितनिधी म्हणून संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करणऱ्या आरोपींना लकवरात लवकर अटक झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करतो”
आरोपींची नाव घ्यायला नेते घाबरतात का? त्या मुद्यावरही संदीप क्षीरसागर यांनी त्यांचं मत मांडलं. “हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. गँग्स ऑफ वासेपूर ही काही प्रकरणांमुळे वस्तूस्थिती आहे. मी ज्या जाती, समाजाचा आहे, तो सुईच्या टोकाएवढा समाज आहे, तरीही मतदारसंघाने दुसऱ्यांदा मला निवडून दिलय” “काही राक्षसी लोक आहेत, जे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. या लोकांची सरकारने गंभीरपणे दखल घेतली, कारवाई केली, तर जिल्ह्यात असे प्रकार थांबतील” असं संदीप क्षीरसागर म्हणाले.
‘हत्या केली, ती सुपारी घेऊन’
“मी पहिला आमदार म्हणून मस्साजोगमध्ये गेलो. चर्चेत गावातल्या लोकांनी वाल्मिक कराडच नाव घेतलं. जिल्ह्याला माहिती आहे, ज्यांनी हत्या केली, ती सुपारी घेऊन केली, याचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्यायाची अपेक्षा आहे” असं संदीप क्षीरसागर म्हणाले. मास्टरमाइंड वाल्मिक कराड कुठे आहे? 18 दिवस उलटले, त्यावर ते म्हणाले की, “सभागृहात मी विषय मांडल्यानंतर पहिल्यांदा एकप्रकारे सर्वपक्षाच्या लोकांनी सहा आमदारांनी हा विषय मांडला. सरकार म्हणून सीएमनी उत्तर दिलं”
‘दबाव आहे असं वाटत का?’
वाल्मिक कराडला अटक करण्यात दबाव आहे असं वाटत का? “सराकरने जाहीर केल्यानंतर या दोन-तीन दिवसात पोलीस यंत्रणांकडून शोध तपास व्यवस्थित चालू आहे. दोन नंबरचे धंदे बंद झालेले आहेत. वाल्मिक कराड निकटवर्तीय आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत, पोलीस यंत्रणांनी ठरवलं, तर कोणत्याही गुन्हेगाराला 24 तासात अटक करतील. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर मंत्रिमंडळात धनंजय मुंडे असतील, त्यांच्या निकटवर्तीयाची चौकशी चालू असताना प्रशासनावर दबाव असेल. तपासात सवलत दिली जाईल”
‘आम्हाला राजकारण करायचं नाही’
“म्हणून आम्ची जिल्ह्यातर्फे विनंती आहे की, हा फास्ट ट्रॅकवर तपास घ्या, फोनचे सीडीआर तपासा. सर्व स्पष्टपणे तुमच्यासमोर येईल. सरकारला विनंती आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. गुन्हेगार निकटवर्तीय आहे, त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, तीन-चार महिन्यात पूर्ण चित्र स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा शपथ घ्या. आम्हाला राजकारण करायचं नाही. वाल्मिक कराडने जिल्ह्यात दोन जातींमध्ये तेढ निर्माण केलीय. जो दोषी आहे, त्याला फासावर चढवा” अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली.