मोठी बातमी, आयआरसीटीसीचं ॲप आणि वेबसाईट बंद, लाखो प्रवाशांना मनस्ताप
Marathi December 26, 2024 03:24 PM

मुंबई : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीची वेबसाईट आणि ॲप डाऊन डाऊन आहे. आयआरसीटीसीनं याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. मेंटेनन्सच्या कामामुळं ई-तिकीट सेवा सध्या उपलब्ध नसेल, असं आयआरसीटीसीनं वेबसाईटवर जाहीर केलं आहे. थोड्या वेळानंतर तिकीट बुकिंगसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन आयआरसीटीसीनं केलं आहे. आज सकाळी 10 वाजण्यापूर्वी या संदर्भातील तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.अनेकांना वेबसाईटवर लॉगिन करता येत नव्हतं. दररोज सकाळी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर तात्काळ तिकिटांची विक्री केली जाते. यासाठी लाखो यूजर्स  लॉगिन करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तात्काळ तिकीट बुकिंग करण्यासाठी लॉगीन होत नसल्याच्या अडचणीचा सामना  अनेकांना करावा लागला.

ऐन सणासुदीच्या काळात आयआरसीटीसीची वेबसाईट आणि ॲप डाऊन झाल्याचं पाहायला मिळालं. तात्काळ तिकीट करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या  मेन्टेनन्स ॲक्टिव्हिटीच्या मॅसेज सोबत ॲप आणि वेबसाईट बंद असल्याचं आयआरसीटीसीकडून जाहीर करण्यात आलं आहे.

सणासुदीच्या काळात आयआरसीटीसीकडून नियोजन आणि देखभालीची कामे करण्यात असल्यानं प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय आयआरसीटीसीच्या नियोजनशून्य कारभाराचा प्रवाशांना मनस्ताप होत आहे.

डाऊन डिटेक्टर्सनं देखील आयआरसीटीसीच्या वेबसाईटला सकाळी अडचणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं असल्याचं म्हटलं.

9 डिसेंबरला देखील आयआरसीटीसीची वेबसाईट आणि ॲप डाऊन झाली होती. संतापलेल्या प्रवाशांनी माध्यमांसमोर त्यांची नाराजी आणि संताप व्यक्त केला. काही यूजर्सनी तात्काळ तिकीटांच्या बुकिंग संदर्भात अश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.

तात्काळ तिकीट बुकिंग करण्याच्या वेळेत आयआरसीटीसीची वेबसाईट बंद झाल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. भारत चंद्रापर्यंत पोहोचला तरी भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीला अजून तात्काळ तिकीट बुकिंगवेळी वेबसाईट क्रॅश होण्यापासून थांबवता येत नाही, असा संताप देखील एका यूजरनं व्यक्त केला. दुसऱ्या यूजरनं अश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार करत म्हटलं की तात्काळ तिकीट बुकिंग कधी सुरु करणार केवळ प्रीमियम तात्काळ बुकिंग पर्याय दिसतोय.

रेल्वे प्रवासाचं तिकीट बुक करण्यासाठी तात्काळ बुकिंगचा पर्याय वापरणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागल्यानंतर आयआरसीटीसीनं देखील याची दखल घेत वेबसाईटवर मेन्टेनन्स सुरु असल्याचं सांगितलं.

इतर बातम्या :

Mukesh Ambani Stock: मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचं वर्चस्व संकटात, टाटा ग्रुपची ‘ही’ कंपनी जवळ पोहोचली, पहिलं स्थान हातून निसटणार?

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.