Virat Kohli Sam Konstas : सॅमला धक्का देणं अंगलट येणार, विराटवर एका सामन्यासाठी बंदी; ICC चा नियम काय सांगतो?
Mensxp December 26, 2024 07:45 PM

Virat Kohli Sam Konstas Shoulder Pushed Controversy : 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी २०२५ मधील बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी पडली. विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा पदार्पण करणारा सॅम कोनस्टास फिजिकल कॉन्टॅक्ट झाला. यामुळे बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्याच दिवशी वातावरण चांगलंच तापलं. 

यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांनी आयसीसीकडे या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. ज्या प्रकारे विराट कोहलीने सॅमला शॉल्डरने पुश केलं ते पाहता आयसीसीने या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी या दोन माजी खेळाडूंनी केली आहे. 

हेही वाचा : Zara Dar OnlyFans : झारा दारने PhD सोडून 'तसल्या' व्हिडिओसाठी प्रसिद्ध OnlyFans मॉडेल होण्याचा का घेतला निर्णय; किती कोटींची होते कमाई?

काय म्हणाला पाँटिंग? 

Image credit © Instagram/rickyponting

समालोचकाची भूमिका बजावणाऱ्या रिकी पाँटिंगने ऑन फिल्ड अंपायर्स आणि सामनाधिकारी यांनी विराट कोहलीच्या या अवाजवी आक्रमकपणा गांभिर्याने घेतला पाहिजे असं मत व्यक्त केलं. 

सेव्हन चॅनलवर बोलताना विराट कोहली म्हणाला की, 'विराट कोहली उजव्या बाजूने आला. त्यानं संपूर्ण खेळपट्टी पार केल अन् सॅमला उकसवण्याच्या उद्येशाने त्याला शॉल्डरने डॅश केले.' 

पाँटिंग पुढे म्हणाला की, 'अंपायर्स आणि सामनाधिकारी हे या प्रकरणाकडे गांभिर्याने पाहतील. एखाद्या फिल्डरचा शोल्डर बॅट्समनच्या जवळ येण्याची कोणतीही स्थिती निर्माण झाली नव्हती. मैदानावरील सर्व खेळाडूंना माहिती असतं की फलंदाज कुठं आहे आणि दोन फलंदाज कुठं एकत्र येत असतात.'

View this post on Instagram

पाँटिंगने १९ वर्षाच्या पदार्पण करणाऱ्या सॅमची बाजू उचलून धरली. तो म्हणाला, 'मी जेवढं पाहिलं आहे त्याप्रमाणे कोन्सटासने खूप वेळाने पाहिले आणि त्याला माहिती देखील नव्हत की त्याच्या समोर कोणतरी चालत येत आहे. जो आता स्क्रीनवर दिसतोय (विराट कोहली) त्याला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहे.' 

पाँटिंगच्या वक्तव्याशी मायकल वॉनने सहमती दर्शवली, तो म्हणाला की सामनाधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभिर्याने पाहिलं पाहिजे आणि विराट कोहली विरूद्ध कारवाई केली पाहिजे. 

हेही वाचा : Champions Trophy 2025 Schedule : भारत - पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये! अखेर आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीचं शेड्युल केलं फायनल

ICC चा नियम काय सांगतो? 

Twitter

दरम्यान, सामनाधिकारी याबाबत गांभिर्याने विचार करणार आहेत असं कळतंय. जर असं झालं तर आयसीसीच्या नियमानुसार काय होऊ शकतं. 

विराट अने सॅममध्ये जो काही प्रकार घडला तो आयसीसीच्या २.१२ नियमाअंतर्गत येतो. आंतरराष्ट्रीय सामन्यावेळी खेळाडूशी, खेळाडूंच्या सपोर्ट स्टाफशी, अंपायर्स, मॅच रेफरी आणि इतर कोणत्याही व्यक्तीशी (यात प्रेक्षकांचा देखील समावेश आहे) अयोग्यपद्धतीने फिजिकल कॉन्टॅक्ट करणे हा नियमभंग ठरतो. 

या नियमानुसार, क्रिकेटमध्ये कोणत्याही व्यक्तीशी चुकीच्या पद्धतीने फिजिकल कॉन्टॅक्ट करण्यास मनाई आहे. खेळाडूने मुद्दाम, रागाच्या भरात किंवा निष्काळजीपणे चालत किंवा धावत येत किंवा खांद्याने खेळाडूंना किंवा अंपायरला धक्का दिला तर हा नियमभंग ठरतो. 

या प्रकारच्या नियम भंग करणाऱ्या कृतीचे, घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचे काही स्तर निर्माण करण्यात आले आहेत. 

  • लेव्हल १ - घटनेची पार्श्वभूमी यात हा फिजिकल कॉन्टॅक्ट हा मुद्दाम केलेला, रागाच्या भरात किंवा निष्काळजीपणामुळे किंवा टाळता येण्यासारखा असतो. 
  • लेव्हल २ - ताकदीने हा फिजिकल कॉन्टॅक्ट केला असेल तर 
  • लेव्हल ३ - या फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये ज्याच्याविरूद्ध हा फिजिकल कॉन्टॅक्ट झाला आहे त्याला दुखापत झाली असेल तर 

विराट कोहलीने केलेला फिजिकल कॉन्टॅक्ट हा कोणत्या लेव्हलचा होता हे ठवण्याचा अधिकार हा सामनाधिकारी अँडी पेक्रॉफ्ट यांना आहे. जर पेक्रॉफ्ट यांना वाटलं की विराटची कृती ही लेव्हल २ ची आहे तर त्याला ३ ते ४ डिमेरीट पाँईंट्स मिळतील अन् त्या परिस्थितीत विराटला पुढचा सामना खेळता येणार नाही. जर पेक्रॉफ्ट यांनी विराटची कृती ही  लेव्हल १ मध्ये मोडते असा जर निर्णय दिला तर विराटवर फक्त आर्थिक दंड लागू शकतो.


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.