2024 Top Multibagger Stock Return: भारतीय शेअर बाजार गेल्या 9 वर्षांपासून सकारात्मक रिटर्न देत आहे. 2024 मध्ये आतापर्यंत निफ्टीने 9.21 टक्के आणि सेन्सेक्सने 8.62 टक्के रिटर्न दिला आहे. आता 2025 हे वर्ष भारतीय बाजारपेठेसाठी कसे असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नाचे उत्तर येत्या काळात सापडेल.
पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की गेल्या एका वर्षात कोणता स्टॉक मल्टी बॅगर बनला आहे. पुष्पाने ज्या प्रकारे बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. त्याचप्रमाणे दलाल स्ट्रीटवर कोणत्या स्टॉकने गुंतवणूकदार मालामाल झाले ते जाणून घेऊया.
2024 मध्ये, एलसिड इन्व्हेस्टमेंट्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले. 21 जून 2024 रोजी या शेअरची किंमत 3.53 रुपये होती. 8 नोव्हेंबर 2024 रोजी शेअरची किंमत वाढून 3,30,473 रुपये झाली.
या वाढीमुळे गुंतवणूकदारांना 5,470,154.96 पट रिटर्न मिळाला. जर एखाद्याने जूनमध्ये 35,000 रुपये गुंतवले असतील तर ती रक्कम 6 महिन्यांत 3300 कोटी रुपये झाली असती. यामुळे हा शेअर या वर्षातील सर्वात मोठा मल्टीबॅगर बनला आहे.
श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन Ntwrk लिमिटेडने देखील गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी या शेअरची किंमत 1.60 रुपये होती, तर 25 डिसेंबर 2024 रोजी शेअरची किंमत 1,814 रुपयांवर पोहोचली. हा शेअर 2,219 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला होता. जर एखाद्याने डिसेंबर 2023 मध्ये 10,000 रुपये गुंतवले असते तर ते आज 28,96,000 रुपये झाले असते. कंपनीने 72,460% रिटर्न दिला आहे.
2024 मध्ये, 500 निर्देशांकाच्या 33 शेअर्सनी 100% ते 320% पर्यंत रिटर्न दिला आहे. या शेअर्समध्ये रिअल इस्टेट, ईएमएस, पॉवर आणि कॅपिटल गुड्स यासारख्या विविध क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. GE Vernova T&D India ने 320.7% रिटर्न दिला. 2023 मध्येही हा शेअर 336% च्या वाढीसह चर्चेत होता.
ज्योती CNC ऑटोमेशनने लिस्ट झाल्यापासून 302% रिटर्न दिला आहे. तो 434 रुपयांवरून 1,331 रुपयांवर पोहोचला. Kfin Technologies ने 197% रिटर्न दिला, शेअरची किंमत 485 रुपयांवरुन 1,444 पर्यंत वाढली. केनेस टेक्नॉलॉजी इंडियाने 180% आणि डिक्सन टेक्नॉलॉजीजने 175% रिटर्न दिला.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.