Latest Maharashtra News Updates: आज राष्ट्रपती भवनात १७ बालक पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित
esakal December 26, 2024 07:45 PM
Delhi Live: आज राष्ट्रपती भवनात १७ बालक पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित

- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात १७ बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करून केलं सन्मानित

- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत वीर बाल दिवस कार्यक्रमात सहभागी

Nashik Live Updates: पुस्तक खरेदी करायला गेलेल्या मुलाला दुकान मालकाकडून अमानुष मारहाण

- पुस्तक खरेदी करायला गेलेल्या मुलाकडून पुस्तक खाली जमिनीवर पडल्याचा दुकानमालकाला आला राग

- 8 वर्षीय चिमुकल्याला दुकानमालकाने चप्पल आणि लाथाबुक्क्यांनी केली अमानुष मारहाण

- जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलाच्या वडीलांनाही दुकानदाराने साथीदारांसह केली मारहाण

- घटनेत मुलगा यशराज पाटील जखमी

- नाशिकच्या सिडको परिसरातील लकी गिफ्ट्स दुकानातील कालची घटना

- अंबड पोलीस ठाण्यात दुकानमालकासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल

Rahul Gandhi Live Updates: राहुल गांधी बेळगावच्या दौऱ्यावर

काँग्रेस खासदार आणि लोकसभा नेते राहुल गांधी दोन दिवसांच्या विस्तारित CWC बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बेळगाव येथे पोहोचले.

Nashik Live : त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हिआयपी दर्शन बंद

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात आता व्हिआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune Live : पुण्यातील 32 रक्तपेढ्यांना कारणे दाखवा नोटीस

पुण्यातील 32 रक्तपेढ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे.

IRCTC Live : आयआरसीटीची वेबसाईट ठप्प,रेल्वे प्रवाशांची तारांबळ

आयआरसीटीसीची वेबसाईट ठप्प झाल्याने आॅनलाईन रेल्वे तिकिट काढणा-या प्रवाशांचे हाल झाले आहेत. दहा दिवसांत दुस-यांदा वेबसाईट ठप्प झाली आहे.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौ-यावर

एकनाथ शिंदे आज दिल्ली दौ-यावर असून ते भाजप अध्यक्ष यांच्या निवासस्थानी पोहचणाक आहेत. तसेच एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार आहेत.

Karnataka Live : काँग्रेसचे आजपासून कर्नाटकात दोन दिवसीय अधिवेशन, केंद्र सरकार विरोधात रणनिती ठरणार

काॅंग्रेसचे कर्नाटकमधील बेळगावी येथे दोन दिवसीय 'नव सत्याग्रह बैठक' या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. या बैठकीत केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Israel Live : इस्रायलचा गाजावर हल्ला, पाच पत्रकारांचा मृत्यू

मध्य गाझामधील नुसिरतमधील अल-अवदा रुग्णालयाजवळ वाहनावर हल्ला झाल्याने पाच पत्रकारांचा मृत्यू झाला, असे एन्क्लेव्हमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात १७ बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात १७ बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Marathwada Live: मराठवाड्यात आजपासून पुढचे तीन दिवस पाऊस आणि गारपिटीचा अंदाज

मराठवाड्यात आजपासून पुढचे तीन दिवस पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तविला आहे. आज सकाळपासून मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये संपूर्ण ढगाळ वातावरण आहे. सूर्यदर्शन झाले नसल्याने पाऊस होण्याची चिन्हे आहेत. रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारेही वाहणार आहेत. वर्षांपासून रब्बी हंगामात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

Nashik: आयुक्त राहुल कर्डिले यांच्या नियुक्तीला ब्रेक ?

महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राहुल कर्डिले यांच्या नियुक्तीला ब्रेक ?

- भाजपचा बडा मंत्री नाराज झाल्यानं कर्डिले यांची नियुक्ती थांबवल्याची चर्चा

- राहुल कर्डिले यांना दोनच दिवसांपूर्वी देण्यात आले होते नियुक्तीचे पत्र

Nashik: नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना उद्धवस्त

- नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना उद्धवस्त

- दिंडोरी पोलिसांनी केली मोठी कारवाई

- दिंडोरीतील लॉजवर सुरू होता छापखाना

- प्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांनी केला जप्त

Beed: संतोष देशमुख खुन, खंडणीसह चारही गुन्ह्यांचा तपास सिआयडीकडे

संसदेपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गाजलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या तसेच पवनचक्की खंडणी, अॅट्रॉसिटी व पवनचक्कीवरील भांडणे या चारही प्रकरणांचा तपास आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.