पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: शेतकऱ्यांसाठी (Farmers) सर्वसामान्य लोकांसाठी सरकारनं (Govt) विविध योजना (Yojana) सुरु केल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana). आत्तापर्यंत या योजनेचे 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. लवकरच 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे सरकार देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत पुरवते. ते थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केली जाते. गेल्यावेळी त्याचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांना देण्यात आला होता. आता 19व्या हप्त्याची वेळ जवळ आली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील 18 वा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये जारी करण्यात आला होता.
पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
यामध्ये New Farmer Registration वर क्लिक करा.
तुमचे सर्व तपशील बँक खात्याच्या माहितीसह भरा.
तुमच्या जमिनीच्या सर्व नोंदी भरा आणि OTP द्वारे पडताळणी करा.
तुमचा मोबाईल नंबर पीएम किसान योजनेशी कसा लिंक करायचा?
पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
फार्मर्स कॉर्नर दिसेल, त्याखाली मोबाईल नंबर अपडेट करा वर क्लिक करा.
पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
फार्मर्स कॉर्नर तेथे दिसेल, त्याखालील लाभार्थी स्थितीवर क्लिक करा.
तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक टाका.
पेमेंट इतिहास आणि पात्रता तपासा.
तुमचा आधार तपशील प्रविष्ट करा
पीएम किसान सन्मान योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आली होती. डिसेंबर 2018 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात. म्हणजेच एका हप्त्यामध्ये 2000 रुपये दिले जातात. पीएम किसान सन्मान योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून 19 व्या हप्त्याची वाट पाहिली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..