Jayanti Chauhan: रतन टाटांची 7000 कोटींची ऑफर नाकारली; पाणी विकून वर्षभरात कमावले 2300 कोटी
esakal December 26, 2024 10:45 PM

Bisleri Buisiness: वर्ष होतं 2022. अचानक ओद्योगिक जगतात खळबळ उडाली. 55 वर्षांपासून भारतातील पॅकेज्ड वॉटर मार्केटवर राज्य करणाऱ्या बिस्लेरीचे मालक रमेश चौहान यांनी जाहीर केले की त्यांना त्यांचा व्यवसाय विकायचा आहे. ते म्हणाले की, वाढत्या वयामुळे ते व्यवसायाची जबाबदारी घेऊ शकत नाहीत आणि त्यांची एकुलती एक मुलगी जयंती चौहान हिला बिस्लेरी व्यवसायात विशेष रस नाही, त्यामुळे त्यांना हा व्यवसाय विकावा लागणार आहे.

पेप्सी, टाटा सारख्या कंपन्या बिस्लेरी विकत घेण्यासाठी आल्या होत्या. या कंपन्यांनी भारतातील 32 टक्के मिनरल वॉटर मार्केटवर राज्य केले. बिस्लेरीचे देशभरात 122 प्लांट आणि 4500 हून अधिक वितरक आहेत. रतन टाटा यांच्या कंपनीने बिस्लेरी विकत घेण्यासाठी 7000 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, पण ही ऑफर 42 वर्षीय जयंतीने फेटाळून लावली होती.

वृद्ध वडिलांच्या इच्छेमुळे जयंती व्यवसायात उतरली. जयंती चौहानकडून कंपनी खरेदी करण्यात स्वारस्य दर्शविणाऱ्या सर्व खरेदीदारांना, त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले की बिस्लेरी विक्रीसाठी नाही.

फॅशन आणि फोटोग्राफीमध्ये रस असलेल्या जयंतीने कंपनीचा नफा तर वाढवलाच पण शीतपेय क्षेत्रात मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांनाही टक्कर दिली. बाटलीबंद पाण्याच्या बिस्लेरीचे वर्चस्व आहे.

गेल्या वर्षी त्यांनी नवीन कार्बोनेटेड पेय बाजारात आणण्याची घोषणा केली. बिस्लेरीने या नवीन उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी विविध डिजिटल आणि सोशल मीडियावर मार्केटिंग सुरू केले. जयंती मार्केटिंगमध्ये तज्ञ आहे.

कोण आहे जयंती चौहान?

जयंती चौहानचा जन्म दिल्लीत झाला. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ती मुंबईला गेली. यानंतर, तिने लॉस एंजेलिस, न्यूयॉर्कमधील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि मर्चेंडाइजिंग (FIDM) मधून पदवी प्राप्त केली.

लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून तिने फॅशन फोटोग्राफी आणि स्टाइलिंगमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तिला फॅशन व्यवसायात पुढे जायचे होते, परंतु वयाच्या 24 व्या वर्षापासून ती तिच्या वडिलांच्या व्यवसायाची जबाबदारी सांभाळत आहे.

जयंती बिस्लेरीच्या मार्केटिंग टीमचे नेतृत्व करते. जाहिरात मोहिमेची जबाबदारी तीच्या खांद्यावर आहे. जयंतीच्या नेतृत्वाखाली, बिस्लेरीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयांचा पाया घातला गेला, तीने बिस्लेरी मिनरल वॉटर, वेदिका नॅचरल मिनरल वॉटर, फिजी फ्रूट ड्रिंक आणि बिस्लेरी हँड प्युरिफायर उत्पादनांचे कामकाज हाती घेतले.

मार्केटिंग व्यतिरिक्त तिला ब्रँड मॅनेजमेंटसह डिजिटल मार्केटिंगमध्ये खूप रस आहे. कंपनीच्या जाहिरातीचे काम ती स्वत: सांभाळते. यांना बिस्लेरी विकत घ्यायची होती, त्यांनी 7000 कोटी रुपयांची ऑफरही दिली होती, पण जयंती व्यवसायात परतल्यानंतर हा करार पुढे ढकलला गेला.

टाटा कॉपर+ आणि हिमालयन सारख्या टाटा समूहाच्या ब्रँड्सना बिस्लेरी टक्कर देत आहे. 7000 कोटींच्या बिझनेस एम्पायरची एकमेव वारसदार जयंती चौहान मुकेश अंबानींच्या रिलायन्स आणि रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालील टाटा, पेप्सी सारख्या कंपन्यांना टक्कर देत आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.