Dinvishesh 27 December : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी; वाचा आजचे 'दिनविशेष'
Sarkarnama December 27, 2024 01:45 PM
Dinvishesh 27 December

1797 - विख्यात शायर व उर्दू काव्याचे जनक मिर्झा गालिब यांचा जन्म. त्यांचे मूळ नाव मिर्झा असदुल्लाखान. त्यांच्या समग्र फारसी कवितांचा "कुल्लियाते गालिब' हा संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्या मित्रांना व अनुयायांना वेळोवेळी लिहिलेल्या उर्दू पत्रांची गणना उर्दूतील अभिजात साहित्यात केली जाते.

Dinvishesh 27 December

1822 - फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व जीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा जन्म. त्यांच्या संशोधनांमुळे अनेक रोगांवर इलाज शोधणे शक्य झाले.

Dinvishesh 27 December

1898 - विदर्भात शिक्षणप्रसार करणारे सामाजिक कार्यकर्ते व माजी केंद्रीय कृषिमंत्री डॉ.पंजाबराव श्यामराव देशमुख यांचा जन्म. कापूस बाजार, शेती क्षेत्रात अनेक आमूलाग्र सुधारणा त्यांनी घडवून आणल्या. त्यांच्या स्मरणार्थ अकोला येथे डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे.

Dinvishesh 27 December

1945 - जगातल्या २८ देशांनी एकत्र येत जागतिक बँकेची (World Bank) स्थापना केली.

Dinvishesh 27 December

1975 - बिहारमध्ये चासनाला येथे कोळशाच्या खाणीत पाणी शिरून झालेल्या अपघातात ३७२ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू.

Dinvishesh 27 December

1996 - प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

Dinvishesh 27 December

2007 - पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची हत्या,

Dinvishesh 27 December

2008 - घरगुती कामगारांच्या कल्याणास चालना देणाऱ्या घरगुती कामगार मंडळ विधेयकास महाराष्ट्र विधानसभेने मंजूरी दिली.

Next : नव्या वर्षात' या' योजनेचा होणार शुभारंभ; गावखेड्यातील जमिनी होणार सुरक्षित!
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.