'जोकर कोहली'! Sam Konstas सोबतच्या वादानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाचा Virat kohli वर निशाणा
esakal December 27, 2024 05:45 AM

Virat Kohli vs Sam Konstas IND vs AUS 4th Test: बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पदार्पणवीर सॅम कॉन्स्टास दोन कारणांसाठी चर्चेत राहिला. पहिलं कारण म्हणजे त्याने पदार्पण सामन्यात फटकेबाजीसह ठोकलेल्या अर्धशतकामुळे व दुसरे कारण म्हणजे त्याच्या विराट कोहली सोबतच्या राड्यामुळे. डावाच्या १० व्या षटकानंतर विराट व सॅम कॉन्स्टास यांच्यात टक्कर पाहायला मिळाली व दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली. त्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचे वादळ उठले. अनेकांनी कोहलीवर टीका केली, तर काहींनी त्याची बाजूही घेतली. अशातच ऑस्ट्रेलियन मीडियानेही विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.

ज्या ऑस्ट्रेलियन मीडियाने विराट कोहलीचे जंगी स्वागत केले होते, त्याच मीडियाने आज विराटवर टीकास्त्र सोडले आहे. विराटचा न्यूजपेपरमध्ये जोकर स्टाईल फोटो प्रिंट करत त्यावर 'विदूषक कोहली' असे टायटल दिले आहे. 'युवा स्वप्नांच्या कसोटी पदार्पणाचा भारताच्या घाबरट खेळाडूला दयनीय धक्का' असा त्यावर मजकूर छापला आहे.

virat kohli in australian newspape

दोघांमधील या भांडणांनतर भारतीय माजी खेळाडूंनीही विराटचे कान टोचले. माजी क्रिकेपटू व माजी प्रशिक्षक रवी शास्री यांनी विराटला असं करण्याची काहीच गरज नव्हती म्हणत, त्याला सुनावले. शास्री म्हणाले, " याची काहीच आवश्यकता नव्हती, विराट एक वरिष्ट खेळाडू आहे. तो संगाचा कर्णधार राहिला आहे. याबाबतीत त्याच्याकडे स्वत:चे स्पष्टीकरण असेल, पण ही एक गोष्ट त्याच्याकडून अपेक्षित नव्हती."

माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कारांनी विराट या घटनेसाठी जबाबदार धरले. "खरोखर, हे टाळता येऊ शकले असते. म्हणजे, असे आहे की तुम्ही एका व्यस्त फुटपाथवरून चालत आहात, आणि तुम्हाला कोणीतरी समोरून येताना दिसले की तुम्ही फक्त बाजूला होता. तुम्ही बाजूला गेल्याने तुम्ही लहान होत नाही (महत्व कमी होत नाही)."

तर सॅम कॉन्स्टासने हा एक क्रिकेटचाच भाग आहे म्हणत प्रकरण मिटवले. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सॅम म्हणाला, " मी माझे ग्लोव्ह्ज घालत होतो आणि त्याने मला अचानक धक्का दिला. मला वाटतं अशा घटना क्रिकेटचाच एक भाग आहे, क्रिकेटच्या प्रेशरचा हा एक भाग आहे. पण या घटनेत मी स्वत:चेच समर्थन करेल."

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.