Pushpa 2 Box Office Collection Day 22 : पुष्पराज झुकेगा नहीं; 'पुष्पा 2'ची जादू 22 व्या दिवशीही कायम
Saam TV December 27, 2024 03:45 PM

Pushpa 2 : 'पुष्पराज' चित्रपटगृहांमध्ये चांगलाच गाजत आहे अल्लू अर्जुनचा हा चित्रपट 5 डिसेंबर 2024 रोजी रिलीज झाला आहे. चित्रपटाने जगभरात प्रचंड कमाई केली आहे. विशेष म्हणजे या तेलगू चित्रपट 'पुष्पा 2'ने हिंदीत सर्वाधिक कलेक्शन केले आहे. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घट झाली आहे. मात्र, याचे कारण वरुण धवनचा 'बेबी जॉन' आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या सुट्ट्या असल्याचे दिसते. मात्र, वीकेंडला पुन्हा एकदा 'पुष्पा 2'च्या कमाईत वाढ होण्याची शक्यता स्पष्टपणे दिसत आहे.

'' रिलीज होऊन तीन आठवडे झाले असून गुरुवारपासून चौथा आठवडा सुरू झाला आहे. या चित्रपटाने 22 व्या दिवशीही चांगली कमाई केली आहे, जी आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या कोणत्याही भारतीय चित्रपटाच्या 22 व्या दिवसाच्या कमाईपेक्षा जास्त आहे. त्याचवेळी हा चित्रपटही नवीन वर्षात झेप घेऊ शकतो, असे दिसते, कारण नुकताच प्रदर्शित झालेला 'बेबी जॉन' हा चित्रपटाला फारशी कमाई करत नाही.

या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 1119.2 कोटी रुपयांची कमाई केली आहे. माहितीनुसार, चित्रपटाने 22 व्या दिवशी 9.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यापैकी 7.25 कोटींची कमाई फक्त त झाली आहे. या चित्रपटाने तेलगूमध्ये 2.02 कोटी रुपये, तामिळमध्ये 30 लाख रुपये आणि मल्याळममध्ये 1 लाख रुपये कमावले आहेत. एकूणच चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 1119.2 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

चित्रपटाने जागतिक पातळीवर सुमारे 1580 कोटी रुपयांची कमाई केली आहे

या चित्रपटाने आतापर्यंत हिंदीमध्ये एकूण 723.9 कोटी रुपये आणि तेलुगूमध्ये 318.12 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने जगभरात 1580 कोटींची कमाई केली आहे. 21 दिवसात भारतात 1322.90 कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन झाले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत परदेशात जवळपास 250 कोटींची कमाई केली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.