स्मिता पाटील व त्यांचे पती सचिन ऊर्फ चंद्रकांत यांनी सहा वर्षांपूर्वी सांगवडे येथे वरद गुरुकुल सैनिकी पॅटर्न निवासी शाळा सुरू केली आहे. तिथेच त्या शिक्षिका तसेच संचालिका म्हणून कार्यरत होत्या.
हुपरी : येथे एसटी बसने (ST Bus Accident) दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेच्या अंगावरून बसचे चाक गेल्याने ती जागीच ठार झाली. स्मिता चंद्रकांत ऊर्फ सचिन पाटील (वय ३४, रा. मूळ गाव इंगळी, सध्या रा. सांगवडे, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे, तर दुचाकीचालक वैभव जाधव (रा. इंगळी) जखमी झाला. हा अपघात अंबाबाई देवीच्या (Ambabai Devi) कमानीसमोर दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला.
दिलेली माहिती अशी, कागल आगाराची (Kagal Bus Stand) एसटी बस (एमएच ०७ सी ९१७०) जुन्या बसस्थानकाकडे निघाली होती. येथील पैसाफंड बँकेसमोरच्या उतारावरून जात असता ब्रेक निकामी झाल्याचे बस चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे बस नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात बसची पुढे असलेल्या ट्रॅक्टर (पीआरइ ४६३३) ला धडक बसली.
याचवेळी बसची समोरून येत असलेल्या एका दुचाकीशी (एमएच ०९ बीआर ९३३८) समोरासमोर धडक झाली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या स्मिता पाटील या रस्त्यावर खाली पडल्या. त्यांच्या अंगावरून बसचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार वैभव जाधव हा जखमी झाला. बसची एअर व ऑईल पाईप निघाल्याने ब्रेक निकामी होऊन हा अपघात झाला. बसचालक विनायक चौगुले (वय ३७, रा. चिमगाव, ता. कागल) याला ताब्यात घेतले आहे.
अपघाताच्या तीन घटनानवीन बस स्थानकासमोर झालेल्या दुसऱ्या एका अपघातात चारचाकी (एमएच ०९ सी ए ४२२२) ने समोरून येणाऱ्या दुचाकीला (क्र.एमएच ०८ इ ८३३३) धडक दिली. त्यात दुचाकीस्वार कुमार अनंत कुलकर्णी (रा. इंगळी) हा जखमी झाला, तर जवाहर साखर कारखान्याजवळ अनोळखी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत युवराज जाधव, ओंकार जाधव (दोघेही रा. रांगोळी) हे जखमी झाले. केवळ दोन तासांच्या अंतराने अपघाताच्या तीन घटना घडल्या.
शिक्षिका, संचालिका म्हणून कार्यरतस्मिता पाटील व त्यांचे पती सचिन ऊर्फ चंद्रकांत यांनी सहा वर्षांपूर्वी सांगवडे येथे वरद गुरुकुल सैनिकी पॅटर्न निवासी शाळा सुरू केली आहे. तिथेच त्या शिक्षिका तसेच संचालिका म्हणून कार्यरत होत्या. तिथेच त्या राहत होत्या. शाळेच्या कामानिमित्त त्या कर्मचारी वैभव जाधव यांच्यासोबत हुपरी येथे आल्या होत्या. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सासू, सासरे असा परिवार आहे.