Mobile Ban For Children: सध्या मोठ्या प्रमाणावर लहान मुलं ही मोबाईलचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतात. जेवण करताना मोबाईल, घरी असताना मोबाईल, तसेच झोपताना देखील मोबाईलचा वापर होत असल्याने मोबाईल स्क्रीनचा वापर अधिक होत असल्याने लहान मुलांवर याचं मोठं परिणाम होताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेत दाऊदी बोहरा समाजाने मोठा निर्णय घेतला आहे. या समाजाने लहान मुलांवर म्हणजेच वयाच्या 15 वर्षापर्यंत मोबाईल वर बंदी घातली आहे. या निर्णयाच समजाकडून स्वागत करण्यात येत असून हा क्रांतिकारक निर्णय असल्याचं बोललं जात आहे.
देशात तसेच जगातील प्रत्येक छोट्या मोठ्या देशात शहरात दाऊदी बोहरा समाज हा आपल्याला पाहायला मिळतो. या समाजाची ओळख म्हणजे या समाजाचे लोक हे व्यवसाय करतात. अतिशय जागृत तसेच एकमेकांना मदत करणारा अशी या समाजाची ओळख असून या समाजाचे धर्मगुरू सय्यदना यांनी नुकतंच मुंबई येथे झालेल्या व्याख्यानात त्यांनी समाजाला आदेश देत हा निर्णय घेतला आहे.
याबाबत दाऊदी बोहरा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते युसुफ डांबरवाले म्हणाले की सध्या लहान मुलांमध्ये मोबाईल स्क्रीन बाबतची जी समस्या आहे तो फक्त आमच्या समजापूर्ता मर्यादित नाही. आजकाल प्रत्येकाच्या घरात ही समस्या निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते.
लहान मुलं सध्या मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर करत असतात. मुल रडली किंवा जेवत नसली की त्यांना पालक हे मोबाईल देत असल्याचं पाहायला मिळतो आणि हीच बाब लक्षात घेत आमचे धर्मगुरू सय्यदना यांनी नालासूपारा इथ झालेल्या प्रवचनात 15 वर्षाच्या मुलांपर्यंत वर बंदी आणण्याचा निर्णय घेतला असून आत्ता या निर्णयाचे आम्ही सर्वजण हे पालन करत आहोत. तसेच ठिकठिकाणी जाऊन मुलांमध्ये मोबाईल न वापरण्याबाबत जनजागृती करत आहोत. अस यावेळी युसुफ डांबरवाले म्हणाले.
यावेळी याच समाजाचे मुर्तुझा मॅनेजर म्हणाले की जेव्हा आमच्या सय्यदना यांनी हा निर्णय घेतला तेव्हापासूनच आम्ही याची अंमलबजावणी ही सुरू केली आहे. आमच्यात सय्यदना जे काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असतो आणि आत्ता त्याचा हा निर्णय लहान मुल देखील मान्य करत आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून माझ्या घरातील माझे मुल आत्ता मोबाईल वापरत नाहीत. हा क्रांतिकारी निर्णय असून मी तर सर्वांना आवाहन करेल की याची अंमलबजावणी सर्वांनी करावी. कारण हे मुलांच्या भवितव्यासाठी खूप महत्त्वाचं असल्याचं यावेळी त्यांनी सांगितल.