Manmohan Singh Daughter : मनमोहन सिंग यांचा जावई IPS तर जाणून घ्या तीन मुली काय करतात?
Sarkarnama December 27, 2024 06:45 PM
Manmohan Singh Family अजातशत्रू राजकीय व्यक्तिमत्व

माजी पंतप्रधान, कुशल अर्थतज्ज्ञ आणि राजकारणातलं अजातशत्रू राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे डॉ. मनमोहन सिंह यांचं 92 व्या वर्षी निधन झालं आहे.

Manmohan Singh Family महत्त्वाची भूमिका

त्यांनी 2004-2014 दोन टर्म भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले आणि देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली.

Manmohan Singh Family पत्नी गुरशरण कौर

फाळणीनंतर डॉ. मनमोहन सिंग यांचे कुटुंब पंजाबमधील अमृतसर येथे गेले. मनमोहन सिंग यांनी 1958 मध्ये गुरशरण कौर यांच्याशी विवाह केला.

Manmohan Singh Family मनमोहन सिंग यांच्या तीन मुली

त्यांना अमृत सिंग, दमन सिंग आणि उपिंदर सिंग अशा तीन मुली आहेत. मनमोहन सिंग यांची मोठी कन्या उपविंदर सिंग या सुप्रसिद्ध इतिहासकार आहेत.

Manmohan Singh Family उपिंदर सिंग 

उपिंदर सिंग या सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांनी मॅकगिल विद्यापीठ, कॅनडातून पीएचडी केली आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहासात मास्टर ऑफ आर्ट्स आणि एम.फिल. पदवी आहे.

Manmohan Singh Family दमन सिंग

मनमोहन सिंग यांची दुसरी मुलगी दमन सिंग त्या लेखिका आहेत. दमन सिंग यांनी सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली आणि इंस्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट, आनंद, गुजरातमधून पदवी मिळवली आहे. दमन यांचे लग्न IPS अधिकारी अशोक पटनायक यांच्याशी झाले.

Manmohan Singh Family अमृत सिंग

मनमोहन सिंग यांची तिसरी मुलगी अमृत सिंग अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन (ACLU) मध्ये वकील आहेत.

Next : पंतप्रधान, अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांनी घेतलेले '6' धाडसी निर्णय
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.