Sambhajiraje Meets Goa CM: संभाजीराजे छत्रपतींनी घेतली गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट; विविध मुद्यांवर झाली चर्चा
dainikgomantak December 28, 2024 01:45 AM

Sambhajiraje Chhatrapati Meets Goa CM Pramod Sawant

पणजी: माजी खासदार तसेच रायगड संवर्धन समितीचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची गुरुवारी (२६ डिसेंबर) भेट घेतली. या भेटीत गोव्याचा ऐतिहासिक वारसा आणि गड - किल्ल्यांचा संस्कृतीला उजाळा देण्यात आला. मुख्यमंत्री सावंत आणि संभाजीराजेंनी या भेटीची माहिती एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.

यांनी संभाजीराजे यांच्यासोबत झालेल्या भेटीचा फोटो त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरुन शेअर केला आहे. सावंत यांनी यावेळी संभाजीराजेंना संदीप मुळीक लिखित गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर हे पुस्तक भेट दिले. या पुस्तकात गोव्यातील गडकिल्ल्यांचा वारसा सविस्तरपणे चित्रीत करण्यात आला आहे.

संभाजीराजे यांनी देखील या भेटीचा फोटो एक्सवरुन शेअर केला आहे. "गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी गोमांतकीय दुर्गाच्या वाटेवर हे पुस्तक भेट दिले. या पुस्तकात श्री शिवछत्रपती महाराज आणि शिवपुत्र श्री छत्रपती संभाजी महाराज यांनी गोव्यात केलेल्या पराक्रमांची आणि गडकिल्ल्यांच्या महत्त्वाची सविस्तर माहिती दिली आहे."

"यावेळी दुर्गराज रायगड किल्ल्याचे चाललेले संवर्धन, तसेच आणि गोव्यामधील इतर गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन याविषयी प्रदीर्घ चर्चा झाली. मा. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे स्वतः शिवप्रेमी असल्यामुळे त्यांचा मराठ्यांच्या इतिहास आणि गडकिल्ल्यांविषयी असलेला आत्मीयतेचा दृष्टिकोन प्रकर्षाने जाणवला. त्यांच्या सहकार्याने किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला जाईल, असा विश्वास वाटतो", असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.