पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यापासून पुणे मेट्रो सतत कार्यरत असून, लाखो प्रवाशांना सुरक्षित आणि वेळेवर प्रवासाची सुविधा मिळत आहे. सुशासन दिनानिमित्त उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मेट्रोच्या पुढील विस्तारासाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य दिले जाईल, तसेच प्रलंबित मार्गांच्या मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी बुधवारी पुणे च्या कामकाजाचा आढावा घेतला. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी प्रवासी संख्या वाढवण्यासाठी तसेच सेवा सुधारण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती पाटील यांना दिली. आढाव्यानंतर पाटील यांनी जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन ते मंडई मेट्रो स्टेशन असा मेट्रोने प्रवास केला. मंडई येथे पोहोचल्यावर त्यांनी स्थानिक आमदार हेमंत रासने यांचे स्वागत केले.
पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील विस्तारीकरणाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.महानगरपालिका (पीसीएमसी) ते निगडी या मार्गासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, या मार्गाचे काम सुरू आहे. तसेच स्वारगेट ते कात्रज मार्गाच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या प्रकल्पासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्यात सात प्रस्तावित मार्गांचा समावेश आहे, अनेक मार्ग च्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेतः
वनाज ते चांदणी चौक (१.२ किमी): दोन स्थानके
रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (११.६३ किमी): ११ स्थानके
खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी (२५.६६ किमी): २२ स्थानके
SNDT-वारजे-माणिकबाग (६.१२ किमी) : ६ स्थानके