Psychology: जीवनात कधीही यशस्वी न होणाऱ्या लोकांमध्ये असतात 'या' सवयी
esakal December 28, 2024 07:45 PM

Habits of unsuccessful people: आपल्या अवतीभोवती असे अनेक लोक असतात जे जीवनात यशस्वी होतात तर काही लोक अपयशी होतात. मानसशास्त्रानुसार काही दैनंदिन सवयींमुळे लोकांना अपयशाला सामोरे जावे लागते. या सवयी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

कठोर निर्णय घेणे टाळणे

अनेक लोक अवघड आणि कठोर निर्णय घेणे टाळतात. त्यांना भिती असते की काही चुकीचे जाले तर काय होईल, पण असे केल्याने जीवनात कधीच पुढे जात नाही. अपयशी लोक कायम तणाव आणि चिंतेत अडकलेले असतात.

स्वयंशिस्तीचा अभाव

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिस्त असणे गरजेचे असते. जे लोक आयुष्यात यशाचे शिखर गाठतात ते कठोर परिश्रमासह स्वत:ला काही गोष्टींसाठी शिस्त लावतात. मानशास्त्रानुसार ज्या लोकांच्या पदरी नेहमी अपयश येते त्यांच्यामध्ये स्वयंशिस्तीचा अभाव जाणवतो.

अति-नियोजन

तुम्हाला वाटेल की नियोजन ही यशीची गुरुकिल्ली आहे आणि तुम्ही बरोबर आहात - एका मर्यादेपर्यंत ते ठिक असते. काही लोक प्रत्येक मिनिटाचे अतिनियोजन करण्यात इतके अडकतात की ते प्रत्यक्षात अंबलबजावणी करणे विसरतात. या सवयीमुळे जीवनात कधीच पुढे जात नाहीत.

भूतकाळात जगणे

अनेक लोक भूतकाळत झालेल्या चुकांमधून शिकतात. पण काही लोक भूतकाळात अडकून पडलेले असतात. या सवयीमुळे लोक जीवनात पूढे जाऊ शकत नाही. त्याच्या डोक्यात जुन्या गोष्टी राहतात.

स्वत: कडे दुर्लक्ष करणे

जे लोक अपयशी होतात किंवा जीवनात पुढे जात नाहीत ते स्वत: कडे दुर्लक्ष करतात. म्हणजे स्वत:ची काळजी घेत नाहीत. सुखी आणि यशस्वी होण्यासाठी रोज शरीराची स्वच्छता ठेवणे, नीट-नेटके कपडे घालणे, मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले ठेवणे गरजेचे आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.