Manmohan Singh Funeral Rites Live Updates : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
Sarkarnama December 28, 2024 04:45 AM
Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शनिवारी अंत्यसंस्कार

माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणारे. यासंदर्भात अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मनमोहन सिंग यांचं निधन हे देशाचे दुःखद नुकसान आहे. ते काँग्रेस आणि देशाचे खरे प्रतीक होते, अशा शब्दात त्यांनी वेणुगोपाल शोक व्यक्त केला.

Sharad Pawar a tribute to Manmohan Singh : जागतिक धुरंधर नेता गमावला - शरद पवार

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. जागतिक धुरंधर नेता गमावला, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटलं, "मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. त्यांच्या जाण्याने देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे. डॉ. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते. भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल. ईश्वर डॉ. मनमोहन सिंह यांच्या आत्म्यास चीरशांती देवो."

Rahul Gandhi On Manmohan Singh : मी आज माझे आदर्श आणि मार्गदर्शक गमावले - राहुल गांधी

मनमोहन सिंग यांनी एकात्मतेच्या, राष्ट्रीयत्वाच्या भावनेने देशाचा कारभार चालवला. त्यांची अर्थशास्त्रातली जाण उत्तम होती. त्याचा आदर्श देश कायम घेत राहिल. श्रीमती कौर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो. मी आज माझे आदर्श आणि माझे मार्गदर्शक गमावले आहेत. काँग्रेस पक्षातले माझ्यासारखे लाखो लोक मनमोहन सिंग यांची आठवण अभिमानाने काढतील, त्यांना कायम स्मरणात ठेवतील, अशा शब्दात राहुल गांधींनी मनमोहन सिंग यांना श्रद्धाजंली वाहिली आहे.

PM Modi On Manmohan Singh : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर PM मोदींकडून शोक व्यक्त

भारताने आज आपला एक सर्वांत प्रतिष्ठित नेता गमावला. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी एक नामांकित अर्थतज्ज्ञ म्हणून ख्याती मिळवली. त्यांनी सरकारमध्ये अर्थमंत्रिपदासह विविध पदांची जबाबदारी सांभाळली आणि आपल्या आर्थिक धोरणांवर ठसा उमटवला. त्यांचा संसदेतील वावर आणि कामकाज अभ्यासपूर्ण होते. पंतप्रधानपदी असताना त्यांनी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, असं म्हणत PM मोदींनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Manmohan Singh Funeral Live: खांद्याला काळी पट्टी बांधून भारतीय खेळाडूंनी वाहिली मनमोहन सिंग यांना

भारतीय खेळाडूंनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिती आहे. ते खांद्याला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. ऑस्ट्रेलियासोबतच्या चौथ्या टेस्ट मॅचसाठी आज ते मैदानात उतरले आहेत.

Manmohan Singh : मनमोहन सिंग यांच्या देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.