अमोल मिटकरी यांनी माझ्या नादाला लागू नये नाही तर त्यांना अवघड जाईल, असा इशारा सुरेश धस यांनी दिला होता. त्यानंतर अमोल मिटकरी यानी ट्विट करत आमदार 'सुरेश धस यांच्या धमकीला पोलिसांनी गांभीर्याने घ्यावं. महागात पडेल म्हणजे काय ?यावरून यांची एकंदरीत कारकीर्द लक्षात येते. गृह विभाग व पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन धस यांचेवर योग्य ती कारवाई करावी .' अशी मागणी केली आहे.
Kailas Phad : कैलास फडला जामीन मंजूरबीड जिल्ह्यात हवेत गोळीबार केल्या प्रकरणी परळी पोलिसांनी अटक केलेल्या कौलास फडला अवघ्या एका दिवसात जामीन मंजूर झाला आहे. काल परळी कोर्टाने कैलास याला एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, आज ( शुक्रवारी) परळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडून कैलास याला जामीन मंजूर झाले.
Pankaja Munde takes charge as a minister : पंकजा मुंडेंनी स्वीकारला मंत्रिपदाचा कार्यभारपंकजा मुंडे यांनी आज (शुक्रवारी) मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी ट्विट करत माहिती दिली की, आज मंत्रालयातील दालनात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे ठरलेले सर्व कार्यक्रम रद्द करून अत्यंत साधेपणाने पदभार स्वीकारून कामकाजाची सुरुवात केली. प्रथम गणेशाची पुजा करून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. तत्पुर्वी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री, शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्री कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Sushil kumar shinde On manmohan singh : मनमोहन सिंग हे अतिशय सुसंस्कृत, सभ्य राजकारणी - सुशीलकुमार शिंदेमनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात काम केलेले नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'मी त्याच्यांसोबत बराच काळ काम केले आहे. मी त्यांच्यासोबत आयसीसीचे सरचिटणीस म्हणूनही काम केले आहे.त्यानंतर मी आंध्र प्रदेशचा राज्यपाल असताना 2006 मध्ये त्यांनी मला त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले आणि पूर्ण विश्वासाने मंत्रिपद सोपवले. एकेकाळी त्यांनी मला लोकसभेचे नेतेही केले.मनमोहन सिंग हे अतिशय सुसंस्कृत आणि सभ्य राजकारणी होते. मी त्यांना कधीच विसरू शकत नाही.', असे शिंदे यांनी म्हटले आहे.
Manmohan Singh Funeral Rites Live : उद्या सकाळी 9.30 वाजता काँग्रेस मुख्यालयातून मनमोहन सिंग यांची अंत्ययात्रा निघणारआज दिवसभर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं पार्थिव त्यांच्या 3 मोतीलाल नेहरू मार्ग या निवासस्थानी ठेवलं जाणार. उद्या सकाळी 8 वाजता त्यांचं पार्थिव काँग्रेस मुख्यालयात ठेवलं जाणार. त्यानंतर सकाळी 8.30 ते 9.30 या वेळेत काँग्रेस मुख्यालयात (AICC) या ठिकाणी कार्यकर्ते आणि काँग्रेस नेत्यांना सिंग यांचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. तर काँग्रेस मुख्यालयातून त्यांची अंत्ययात्रा सकाळी 9.30 सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Anna Hazare On Manmohan Singh : मनमोहन सिंग खऱ्या अर्थाने सच्चा माणूस होते - अण्णा हजारेदेशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. काही माणसं जन्माला येतात आणि जातात. मात्र काही माणसं समाज आणि देशाचा विचार करतात त्यापैकी मनमोहन सिंग होते. आंदोलनाच्या माध्यमातून त्यांची आणि माझी अनेकदा भेट झाली. नेहमी देशाविषयी आणि समाजाविषयी आस्था असणाऱ्या माणसाचे दुःखद निधन झाल्याने दुःख वाटलं. ते खऱ्या अर्थाने सच्चा माणूस होते नेहमी देशाचा विचार करायचे निसर्गाच्या रूढीप्रमाणे माणसं येतात जातात. मात्र एक सच्चा माणूस गेल्याने दुःख वाटलं, अशा शब्दात अण्ण हजारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Rupali Chakankar Live News : फाशी मिळावी यासाठी पाठपुरावा करू - चाकणकरराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राजगुरूनगर येथील लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शिवाय या प्रकरणाचा तपास पोलिस चांगल्या पद्धतीने करत असल्याचंही चाकणकर यांनी सांगितलं.
Manmohan Singh Funeral Rites Live : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मनमोहन सिंग यांच्या श्रद्धांजलीचा ठराव संमतकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली ठराव पारित करण्यात आला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Sharad Pawar On Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर शरद पवार यांची प्रतिक्रियाआजचा दिवस देशाच्या दृष्टीने अस्वस्थ करणारा आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी दिलेलं योगदाना मुळे ही अस्वस्थता आहे. खरंतर त्यांचा पिंड राजकारणी नव्हता. ते विचारवंत होते. देशाच भवितव्य घडविण्याचा त्यांचा विचार होता. माझा त्यांचा परिचय मुंबईचा होता. मी मुख्यमंत्री असताना ते RBI चे गव्हर्नर होते. त्यामुळे आमचा संवाद होता.
नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थ खात्याचे मंत्री होते. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील काही कमिट्या होत्या त्यात आम्ही सोबत होतो. त्यावेळी त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. ते मितभाषी होते. देशाचे पंतप्रधान झाल्यावर ते अर्थ व्यवस्थेला दिशा देण्याच काम त्यांनी केलं. देशाची अर्थव्यवस्था सावरण्याची प्रक्रिया त्यांनी केली.
भरीव निर्णय घेऊन त्यांनी देशाला संकटातून बाहेर काढले. मी माझ्यावतीने जुना सहकारी म्हणून त्यांच्या कुटुंबियांना हा दुखाचा धक्का सहन करता यावा, यासाठी प्रार्थना करतो आणि श्रध्दांजली वाहतो.
Manmohan Singh Funeral Rites Live : राहुल गांधींनी घेतलं मनमोहन सिंग यांचं अंतिम दर्शनकाँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं अत्यंदर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस खासदार प्रियांका वाद्रा, तसेच सोनिया गांधी आणि मल्लिकार्जून खरगे देखील उपस्थित होते.
डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झालं ही देशाचे हानी. आपले अर्थव्यवस्था दहा वर्षात इतके उपाध्यक्ष करून देखील टिकून आहे. सध्याच्या सरकारने एवढे सुरंग लावले तरी ती टिकून आहे याचा सर्व श्रेय डॉ. मनमोहन सिंग यांना जातं.
नोटबंदीमुळे देशाचा जीडीपी घसरेल असे अनेक इशारे त्यांनी दिले आणि ते खरे ठरले होते. तसंच आज नरेंद्र मोदी हे फुकट धान्य देत आहेत कोणीही उपाशी राहणार नाही प्रत्येकाच्या घरात चूल पेटते ही योजना मनमोहन सिंग यांची आहे.
अन्नसुरक्षा कायदा हे त्यांनी आणला. अशा अनेक योजना त्याने देशाच्या जनतेसाठी आणल्या. अत्यंत प्रामाणिक आणि त्यांचा बोलबाला शेवटपर्यंत टिकला, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
Manmohan Singh Funeral Rites Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शनपंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माजी पंतप्रधान मननोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.
आज मध्यरात्री 1 वाजता डॉ. मनमोहन सिंह यांची मुलगी अमेरिकेहून परतणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सुत्रांनी दिली आहे. मनमोहन सिंह यांचे पार्थिव उद्या सकाळी 8 ते 10 या वेळेत AICC येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह सर्व बडे नेते माजी पंतप्रधानांना काँग्रेस मुख्यालयात श्रद्धांजली वाहतील. तर राजघाटाजवळ जिथे पंतप्रधानांचे अंतिम संस्कार केले जातात, तिथेच डॉ. मनमोहन सिंह यांच्यावरही अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.
काँग्रेस मनमोहन सिंह यांच्या अंत्यसंस्कारासाठी अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणेच जागा मागणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Dr. Manmohan Singh Passes Away : PM मोदी घेणार डॉ. मनमोहन सिंह यांच्या पार्थिवाच अंत्यदर्शनपंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या पार्थिवाच अंत्यदर्शन घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 10 वाजता 3 मोतीलाल नेहरू मार्ग या निवासस्थानी ते अंत्यदर्शन घेणार असल्याची माहिती आहे.
Manmohan Singh Funeral Live Update : दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकलामाजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अशातच आता दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयातील (AICC) राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आला आहे.
Manmohan Singh Funeral Live : डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शनिवारी अंत्यसंस्कारमाजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणारे. यासंदर्भात अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मनमोहन सिंग यांचं निधन हे देशाचे दुःखद नुकसान आहे. ते काँग्रेस आणि देशाचे खरे प्रतीक होते, अशा शब्दात त्यांनी वेणुगोपाल शोक व्यक्त केला.
Sharad Pawar Tribute to Manmohan Singh : जागतिक धुरंधर नेता गमावला - शरद पवारमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. जागतिक धुरंधर नेता गमावला, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटलं, "मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. त्यांच्या जाण्याने देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे.
डॉ. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते. भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल. ईश्वर डॉ. मनमोहन सिंह यांच्या आत्म्यास चीरशांती देवो."
मनमोहन सिंग यांनी एकात्मतेच्या, राष्ट्रीयत्वाच्या भावनेने देशाचा कारभार चालवला. त्यांची अर्थशास्त्रातली जाण उत्तम होती. त्याचा आदर्श देश कायम घेत राहिल. श्रीमती कौर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो.
मी आज माझे आदर्श आणि माझे मार्गदर्शक गमावले आहेत. काँग्रेस पक्षातले माझ्यासारखे लाखो लोक मनमोहन सिंग यांची आठवण अभिमानाने काढतील, त्यांना कायम स्मरणात ठेवतील, अशा शब्दात राहुल गांधींनी मनमोहन सिंग यांना श्रद्धाजंली वाहिली आहे.
भारताने आज आपला एक सर्वांत प्रतिष्ठित नेता गमावला. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी एक नामांकित अर्थतज्ज्ञ म्हणून ख्याती मिळवली. त्यांनी सरकारमध्ये अर्थमंत्रिपदासह विविध पदांची जबाबदारी सांभाळली आणि आपल्या आर्थिक धोरणांवर ठसा उमटवला. त्यांचा संसदेतील वावर आणि कामकाज अभ्यासपूर्ण होते. पंतप्रधानपदी असताना त्यांनी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, असं म्हणत PM मोदींनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
भारतीय खेळाडूंनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिती आहे. ते खांद्याला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. ऑस्ट्रेलियासोबतच्या चौथ्या टेस्ट मॅचसाठी आज ते मैदानात उतरले आहेत.
Manmohan Singh Funeral Live : मनमोहन सिंग यांच्या देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाभारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.