Nitish Reddy Century: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नमध्ये कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात नितीश कुमार रेड्डीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. टीम इंडिया फॉलोऑन वाचवण्यासाठी धडपडत असताना नितीशने झुझार खेळी करत शतक झळकावलं. त्याने 172 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि या शानदार खेळीत 10 चौकार आणि एक षटकारही लगावला.
नितीश रेड्डी आता ऑस्ट्रेलियात शतक ठोकणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. नितीश यांनी वयाच्या 21 वर्षे 216 दिवसात ही कामगिरी केली आहे.ऑस्ट्रेलियामध्ये नितीश रेड्डीपेक्षा कमी वयात शतक झळकावणारे दोन खेळाडू आहेत. पहिला म्हणजे सचिन तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे ऋषभ पंत.