डिसेंबर हा असा महिना आहे ज्यात प्रत्येकजण फिरण्यासाठी बाहेर पडतो. तसेच अनेक शाळांमध्ये हिवाळी सुट्ट्या तसेच ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्याने अशा परिस्थितीत लोकं नवीन वर्ष साजरे करण्यासाठी व या वर्षाचा शेवट आनंदाने साजरा करण्यासाठी डोंगराळ प्रदेशात जात आहेत. बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी उत्तर भारतातील बहुतांश लोकं हिमाचल, शिमला आणि मनालीला जात आहेत. परंतु या दिवसांमध्ये येथील परिस्थिती बिकट झाली असून सुमारे १० हजार वाहने अडकून पडली आहेत.
तुम्ही सुद्धा शिमला- मनालीला जाण्याचा प्लॅन केला होता पण तेथील परिस्थिती पाहता फिरण्याचा प्लॅन पुढे ढकलत असाल तर मूड खराब करून घेऊ नका कारण भारतात इतरही अनेक सुंदर ठिकाणे आहेत जी केवळ नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण नाहीत तर ते ठिकाण कमी गर्दीचे आहेत. येथे आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जे पर्वतांना पर्याय म्हणून उत्कृष्ट ठरू शकतात.
जर तुम्ही शिमला- मनालीला जाण्याचा प्लॅन केला होता, पण तेथील वाहतूक कोंडी आणि गर्दी टाळू इतर ठिकाणी फिरण्याचा प्लॅन करत असाल तर बिनसर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. येथे बिनसर वन्यजीव अभयारण्यात तुम्हाला दुर्मिळ पक्षी आणि वन्य जीव पाहायला मिळतात. बिनसर येथून हिमालय पर्वतरांगेचे दृश्यही अतिशय सुंदर दिसते.
राजस्थानच्या थार वाळवंटात वसलेले जैसलमेर हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. येथील सोनेरी किल्ले, हवेली आणि वाळवंटी भागात ट्रेकिंगचा अनुभव अतिशय नेत्रदीपक असतो. येथे तुम्ही उंट सफारीचा ही आनंद घेऊ शकता.
वायनाड हे केरळमधील एक सुंदर हिल स्टेशन आहे. हिरवळ, चहाच्या बागा आणि धबधब्यांसाठी हे शहर प्रसिद्ध आहेत. येथे तुम्ही पिरमेडू, इडुक्की धरण आणि मीठा धबधब्याला भेट देऊ शकता. शांत आणि निवांत वातावरण आवडणाऱ्या लोकांसाठी ही जागा परफेक्ट आहे.
रामेश्वरम हे तामिळनाडूतील एक ऐतिहासिक आणि धार्मिक शहर म्हणून ओळखले जाते. येथे भगवान शंकराचे ज्योतिर्लिंगही आहे. रामेश्वरम हे मंदिर समुद्रकिनाऱ्यावर वसलेले आहे आणि शांत वातावरणात सुट्ट्यांसाठी परिपूर्ण ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही गर्दीशिवाय आरामात सुट्ट्या एन्जॉय करू शकता.