Maharashtra News Live: मालेगाव येथे वरली मटका जुगारावर पोलीस पथकाची धाड, २१ जणांवर कारवाई, ४ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Saam TV December 29, 2024 02:45 AM
Ghatkopar: घाटकोपर मध्ये ही कुरल्याची पुनरावृत्ती टेम्पोने चिरडले , एकाचा मृत्यू चार जखमी

कुर्लाची बेस्ट अपघात घटना ताजी असतानाच घाटकोपर मध्ये देखील एक टेंपो चालकाने भाजी मार्केटमध्ये गाडी घुसवून पाच जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. घाटकोपरच्या चिराग नगर मार्केटमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत प्रीती रितेश पटेल या महाराष्ट्रात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रेश्मा शेख, मारूफा शेख, तोफा शेख आणि मोहरम अली अब्दुल रहीम शेख हे पादचारी जखमी आहेत. या प्रकरणी चालक उत्तम बबन खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चिराग नगर मार्केटमध्ये शिरतानाच अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने बाजारात आलेल्या पाच जणांना चिरडले. स्थानिकांनी जखमींना राजवाडी रुग्णालयात उपचारासाठी नेले. घटनास्थळी घाटकोपर पोलीस दाखल झाले आणि त्यांनी चालक आणि टेम्पो ला ताब्यात घेतले आहे.रात्री उशिरा पर्यंत या बाबत पोलिसांचा तपास सुरू होता.

१४० कोटींच्या रस्त्यांच्या कामासंदर्भात धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा

नगरोत्थान महाअभियानांतर्गत धाराशिव नगर परिषदेला मंजुर झालेल्या १४० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना गेल्या नऊ महिन्यांपासून जाणूनबुजून अडवून ठेवल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केलाय. तर दरम्यान ८ मार्च २०२४ ते २८ मार्च २०२४ या कालावधीत निविदा सादर करण्याची मुदत होती. २९ मार्च २०२४ रोजी निविदा उघडण्यात येणार होत्या माञ निविदा प्रक्रिया जाणूनबुजून उघडू दिली नाही यासाठी मुख्याधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करावी जेणेकरून कोणाच्या सांगण्यावरून कामे थांबवली हे लक्षात येईल अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलीय.

पवनचक्की प्रकल्पावरून होणारे वाद थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी अॅक्शन मोडवर

धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीच्या वादातून शेतकऱ्यांवरील होणारे हल्ले थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी अॅक्शन मोडवर आले असुन जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांनी अधिकाऱ्यांची पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची गठीत केली आहे.दरम्यान या समीतीची पहीलीची बैठक पार पडली यामध्ये शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी मांडल्या तर जिल्हाधिकारी नेमकं किती व कोठे पवनचक्की उभारण्यात येतेय याची प्रशासनाला माहीती देण्यात आली नसल्याची बाब उघड झाली असुन पवन ऊर्जा कंपन्यांना जिल्हा स्तरावर विविध स्वरूपाच्या परवानगी देण्यासाठी नियमावली बनविण्यात येणार आहे तर ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची थेट तक्रार असेल तिथे तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी पंचनामा करतील व काही गैर कारवाई होत आहे असे आढळल्यास प्रकल्प बंद केला जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांनी दिलीय.

Unseasonal Rain: उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात अवकाळी पाऊस

उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. त्यानंतर रात्रीच्या सुमारास ढग अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. या भागातील जरा दोन दिवसांपासून उष्मा वाढला होता. तसच रात्री पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

Unseasonal Rain: बदलापूर आणि वांगणी परिसरात अवकाळी पाऊस

बदलापूर आणि वांगणी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या भागातील थंडी गायब झाली असून वातावरणात उष्मा वाढला होता. तसेच ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. त्यानंतर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ढग दाटून आले आणि पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. मात्र बदलापूरच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. या भागात हंगामी टोमॅटो, वांगी, वाल, हरभरा पिकवला जातो. आणखी दोन दिवस ढगाळ वातावरण आणि असाच पाऊस राहिला तर टोमॅटो, वांगी तसेच इतर पिकांना फटका बसू शकतो.

मालेगाव येथे वरली मटका जुगारावर वाशिम उपविभागीय पोलीस पथकाची धाड, २१ जणांवर कारवाई, ४ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाशिमच्या मालेगाव शहरात काही इसम वरली मटक्याचा जुगार खेळत आहेत. अशा गोपनीय माहितीवरुन वाशिमचे उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी त्यांच्या पथकासह बस स्टँड व आठवडी बाजार या दोन ठिकाणी छापा टाकला असता येथे मिलन तसेच कल्याण नावाचे जुगार खेळतांना मिळुन आले. यात आरोपीकडून नगदी 1 लाख 27 हजार 905 रुपये, वरली मटक्याच्या चिठ्या, 5 दुचाकी,19 मोबाईल असा एकूण 4 लाख 96 हजार 805 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर अवैध वरली मटक्याचा जुगार चालविणारे व जुगार खेळणारे एकूण 21 आरोपींवर मालेगाव पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.