२०२४ वर्षात आयपीओ बाजारातून कंपन्यांनी उभारले तब्बल १.३ लाख कोटी, शेवटच्या दिवशी आणखी दोन आयपीओ उघडणार
मुंबई : भारताच्या आयपीओ मार्केटसाठी २०२४ हे उल्लेखनीय वर्ष ठरले आहे. आता आपण २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात प्रवेश करीत असताना आणखी दोन आयपीओ बाजारात येणार आहेत. ते म्हणजे इंडो फार्म इक्विपमेंट आणि टेक्नीकेम ऑर्गेनिक्स होय. हे दोन्ही आयपीओ येत्या आठवड्यात २०२४ च्या शेवटच्या व्यापारी सत्रात म्हणजे ३१ डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शन साठी खुले होणार आहे. यासोबतच ६ आयपीओची बाजारात लिस्टिंग होणार आहे. या क्रियाकलापासह २०२४ च्या विक्रमी पातळी गाठलेल्या आयपीओ मार्केटची समाप्ती होईल.नवीन वर्ष २०२५ मध्येही आयपीओ बाजाराची मजबूत गती कायम राहणार आहे. काही तज्ज्ञांचा अंदाज आहे की, कंपन्यांचा एकूण निधी उभारण्याचा आकडा २ लाख कोटींच्या पुढे जाऊ शकतो. यावर्षी सर्व कंपन्यांनी आयपीओ बाजारातून १.३ कोटींची उभारणी केली आहे. पुढील आठवड्यात आयपीओ बाजारातील अपडेट्स
इंडो फार्म इक्विपमेंट आयपीओट्रॅक्टर आणि कृषी मशीनरी बनवणारी कंपनी Indo Farm Equipment चा आयपीओ ३१ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असणार आहे. कंपनीने आयपीओसाठी २०४-२१५ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे, ज्यामध्ये एका लॉटमध्ये ६९ शेअर्स असतील. गुंतवणूकदारांना यापटीत सबस्क्रिप्शन करावे लागेल.चंदीगड येथील कंपनीच्या या आयपीओमध्ये ८६ लाख नवीन इक्विटी शेअर्स आणि प्रवर्तक रणबीर सिंह खडवालिया यांच्या भागिदारीतील ३५ लाख शेअर्स विक्रीला (OFS) असणार आहे.१९९४ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने पिक अँड कॅऱी क्रेन निर्माणच्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी नवीन युनिटची स्थापना केली आहे. आय़पीओतून उभारण्यात आलेला निधी या युनिटच्या विस्तारासाठी, कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट कामांसाठी करण्यात येणार आहे.आर्यमन फायनान्शिअल सर्विसेस या आय़पीओचे बुक रनिंग लीड व्यवस्थाक असून शेअर्स एनएसई आणि बीएसईवर सूचिबद्ध होणार आहेत.
टेक्नीकेम आयपीओ (एसएमई प्लॅटफॉर्म)Technichem Organics चा एसएमई आयपीओ ३१ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. या आयपीओमध्ये २५ कोटींच्या नवीन इक्विटी शेअर्ससाठी बोली लावली जाईल. आयपीओचा किंमतपट्टा ५२-५५ रुपयांदरम्यान असून एका लॉटमध्ये २००० शेअर्स असणार आहेत.ही कंपनी विविध प्रकारचे रसायने, विशेष घटक, पिगमेंट आणि डाय इंटरमीडिएट्स आणि एअर ऑक्सीडेशन रसायनांच्या निर्मितीमध्ये कार्यरत आहे. कंपनी फार्मास्यूटिकल्स, कृषी, कोटींग्स, पिगमेंट, डायसह विविध उद्योगांना सेवा प्रदान करते.