Health Tips : ऑफिसमध्ये असा वा घरी, लंचनंतर किती पाऊलं चालावी?
Marathi January 01, 2025 02:25 PM

जेवल्यानंतर चालावे असा सल्ला कायम देण्यात येतो. जेवल्यानंतर चालल्याने अन्न पचते आणि वजनही कंट्रोलमध्ये राहते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी ही चांगली सवय मानली जाते. आर्युर्वेदातही याचा उल्लेख करण्यात आला आहे. पण, आपण घरी असल्यावर या सवयीचे पालन करू शकतो, पण, ऑफीसमध्ये असल्यावर काय? असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? मग ही बातमी तुमच्यासाठी. ऑफिसमध्ये असल्यावर जेवल्यानंतर चालणे शक्य होईलच असे नाही. जाणून घेऊयात, ऑफिसमध्ये असा वा घरी, लंचनंतर किती पाऊलं चालावीत.

लंचनंतर किती पावले चालावीत?

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थनुसार, ऑफिसमध्ये लंचनंतर कमीत कमी 10 मिनिटे चालायला हवीत. आपण 10 मिनिटे चालल्यानंतर 1000 पावले चालतो. जर तुम्ही जेवल्यानंतर 1000 पावले चालत असाल तर 400 ते 500 कॅलरी बर्न होतात.

घरी जेवल्यानंतर किती चालावे?

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थनुसार, घरी दुपारी जेवल्यानंतर कमीत कमी अर्धा तास चालायला हवे. तुम्ही जेव्हा 30 मिनिटे चालता तेव्हा 3000 कॅलरी बर्न होतात, ज्यामुळे वेटलॉससाठी फायदा होतो.

जेवल्यानंतर लगेचच चालावे का?

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थनुसार, जेवल्यानंतर 3 ते 5 मिनिटांनी चालणे सुरु करावे, असे करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते.

जेवल्यानंतर चालल्याने होतात हे फायदे –

  • जेवल्यानंतर चालल्याने पोट फुगणे, गॅसच्या समस्या जाणवत नाही.
  • जेवल्यानंतर चालल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
  • याशिवाय तुम्हाला सतत निद्रानाशेची समस्या जाणवत असेल तर जेवल्यानंतर काही वेळ चालायला हवे.
  • जेवल्यानंतर चालल्याने झोपेची समस्या कमी करू शकते.
  • जेवल्यानंतर चालल्याने मूड सुधारतो, ज्यामुळे डिप्रेशन, स्ट्रेसची समस्या जाणवत नाही.
  • एका रिपोर्टनुसार, जेवल्यानंतर किमान 10 मिनिटे चालल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

 

 

 

 

हेही पाहा –


संपादन – चैताली शिंदे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.